ETV Bharat / city

गर्दी टाळण्यासाठी गणेश विसर्जनासाठी मिळणार ॲानलाइन टाईमस्लॅाट, डीजीठाणे प्रणालीद्वारे महापालिकेचा उपक्रम - ठाणे कोरोना अपडेट बातमी

१४ ऑगस्टपासून ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडावा. आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करावा. महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

thane municipal corporation start app for online time booking for ganesh idol immersion

author img

By

Published : Aug 13, 2020, 8:34 AM IST

ठाणे - संपूर्ण राज्यामध्ये पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्शपाठ ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घालून देण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून ॲानलाइन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करुन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात श्रींची मूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणालीद्वारे ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरू करण्यात येत आहे.

विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही 13 ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती आणि एकूण 20 ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. सदर ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देऊन व भाविकांच्या सोयीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आता डिजीठाणे कोविड-१९ डॅशबोर्डच्या संकेतस्थळावर विसर्जनाची टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१४ ऑगस्टपासून ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडून आपल्या प्रभागातील कृत्रिम तलावांची किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

हॅाटस्पॅाट आणि प्रतिबंधित क्षेत्रांमधील गणपती मूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर विसर्जनास परवानगी देण्यात येणार नाही. नागरिकांनी घरच्या घरीच श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करून कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवामध्ये कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.