ETV Bharat / city

अबब....ठाण्यातील ५० टक्के नाल्याची झाली 'सफाई', नालेसफाईच्या दोऱ्यानंतर आयुक्तांच अजब दावा - ठाणे महानगर पालिका बातमी

पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाय योजनासोबत यंदा नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू केली असून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाची पाहणी केली. दरम्यान पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही यांची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतानाच उर्वरित नालेसफाईची कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश त्यांनी घनकचरा विभागास दिले आहेत.

thane municipal commissioner on pre monsoon nalesafai
नालेसफाईच्या दोऱ्यानंतर आयुक्तांच अजब दावा
author img

By

Published : May 29, 2022, 12:42 PM IST

ठाणे - मान्सून तोंडावर आला असल्याने ठाणे शहरातील नालेसफाईला सुरुवात झाली आहे. याच नालेसफाईची पाहणी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली असून शहरातील ५० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे. दरम्यान २७ एप्रिल रोजी सुरू झालेली नालेसफाई काही दिवसांत ५० टक्के झाल्याच्या अजब दाव्यामुळे नक्की नालेसफाई होते का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. पालिका आयुक्तांच्या दौऱ्यात काही ठिकाणी नाल्यात तुडूंब भरले असल्याचे वास्तव समोर आहे. तर वागळे इस्टेटमधील बऱ्याच नाल्याच्या सफाईला सुरुवातच झाली नसल्याचे ५० टक्के नालेसफाईचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नालेसफाईची कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश - पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाय योजनासोबत यंदा नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू केली असून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाची पाहणी केली. दरम्यान पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही यांची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतानाच उर्वरित नालेसफाईची कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश त्यांनी घनकचरा विभागास दिले आहेत.

नाले साफसफाई कामाची पाहणी - सकाळ पासून महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी कै.महादेव पाटील चौक, पाचपाखाडी येथून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यांनतर ज्ञानसाधना कॉलेज, धर्मवीरनगर, सुपरमॅक्स कंपनी, ब्राडमा कंपनी तसेच वागळे बस डेपो येथील नाले साफसफाई कामाची पाहणी केली. या सर्व नाल्याची खोली वाढविणे, नाल्याच्या बाजूची पडलेल्या भिंती बांधणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित विभागाला दिल्या.

नालेसफाईमध्ये आयुक्तांच्या समोर विना सुरक्षा काम - नालेसफाई करताना घेण्याच्या सुरक्षा साधनांचा वापर केला नव्हता. मात्र, अशा वेळी आयुक्तांनी ठेकेदारांना ही साधने वापरणे आवश्यक होते. मात्र, तशा पद्धतीच्या सूचना दिल्या नाही जर एखादा अपघात घडला तर तो कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.