ETV Bharat / city

Mayor violated COVID 19 rules: ठाणे महापौरांकडूनच कोरोनाचे नियम पायदळी! गर्दीत उद्घाटन सोहळा - Mayor violated COVID 19 rules

एकीकडे  मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे तसेच कोरोनाच्या नियमांचे  पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यात महापौर नरेश म्हस्के ( Naresh Mhaske violated COVID 19 rules ) या आवाहनाला फाटा देत भव्य उद्घाटन कार्यक्रम ( Cricket match in Thanes Kopari ) आयोजित केला. त्या ठिकाणी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन
author img

By

Published : Jan 7, 2022, 7:16 PM IST

Updated : Jan 7, 2022, 7:28 PM IST

ठाणे - वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के ( Thane Mayor violated covid 19 rules ) यांनी केले आहे. दुसरीकडे महापौरांनीच नियम पायदळी तुडवले असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. शुक्रवारी कोपरी येथे महापौर निधीतून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाच्या उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

कोपरी येथील सभा मंडपाच्या उद्घाटन कार्यक्रमात क्रिकेट सामन्याचेदेखील आयोजन ( Cricket match in Thanes Kopari ) करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती, काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना कोरोनाचा विसरच पडला असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार रवींद्र फाटक ( Shivsena MLA Ravindra Phatak ) , नगरसेविका मालती पाटील ( Thane Corporator Malati Patil ) यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी गर्दी केली होती.

ठाणे महापौरांकडूनच कोरोनाचे नियम पायदळी

हेही वाचा-Mini Lockdown In Mumbai? : मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापेक्षा मिनी लॉकडाऊन बरा - किशोरी पेडणेकर

ठाण्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ-
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यात महापौरांनी या आवाहनाला फाटा देत भव्य उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला. त्या ठिकाणी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. ठाण्यातदेखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होऊन रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. मात्र महापौरच गर्दीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत आहेत.

हेही वाचा-Malegaon Bomb Blast Case : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधातील साक्षीदाराने फिरवली साक्ष, ATS वर गंभीर आरोप

महापौरांना एक न्याय नागरिकांना वेगळा न्याय

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या सामान्य नागरिकांवर कठोर कारवाईची भीती दाखवली जाते. तर मग राजकीय कार्यक्रम आयोजित करणाऱ्यावर कारवाई का केली जात नाही ? ठाण्याचे प्रथम नागरिक महापौरच अशा प्रकारे कोरोना नियमांचा फज्जा उडवत असतील तर कोरोना रुग्णसंख्या कशी कमी होईल ? असा सवाल ठाणेकर नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नियम पाळणारे महापौर हे कोरोनाच्या तिसऱ्या लाट गंभीरपणे नाहीत का? असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा-Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार

Last Updated : Jan 7, 2022, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.