ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली ( Thackeray group fought hard ) असून सुरवातीच्या मतमोजणीत सर्वाधिक सरपंच ठाकरे गटाचे निवडणून आल्याचे सांगण्यात आले. तर मनसेने खाते उघडत दोन ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. तसेच शिंदे गटाला मतमोजणीच्या निकालाअंती 42 तर भाजपाला 26 ठिकाणी यश मिळाले आहे. तर ठाकरे गटाला अंतिम मतमोजणीत 40 ग्रामपंचायतीवर झेंडा फडविकण्यात यश मिळाले. तर राष्ट्रवादीला 9 ठिकाणी यश मिळाले. तर 16 ग्रामपंचायतीवर विविध स्थानिक पॅनलने विजय मिळवला. यामुळे मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात आजही उद्धव ठाकरे शिवसेनेचा बोलबाला असल्याचे दिसून आले.
ठाकरे गटाला मतदारराजाने दिला कौल : विशेष म्हणजे ठाकरे गट व शिंदे गटातील सत्ता संघर्षानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 158 पैकी 31 सरपंच बिनविरोध निवडणून आले आहेत. तर 25 ठिकाणी मतदान प्रक्रिया झाली नाही, तर बिनविरोध निवडून आलेल्यामध्ये ठाकरे गट, शिंदे गटासह राष्ट्रवादी आणि भाजप या चारही राजकीय पक्षाचे सरपंच बिनविरोध निवडून आले. शिवाय 1 हजार 453 सदस्यापैकी 487 सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तर उर्वरित 119 ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाला मतदारराजाने कौल दिल्याचे दिसून आले आहे.
ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे
भिवंडी एकूण ग्रामपंचायत-31
निकाल जाहीर 31
शिवसेना - 14
शिंदे गट - 01
भाजप- 07
राष्ट्रवादी- 00
काँग्रेस- 00
मनसे - 02
इतर-07
शहापूर एकुण ग्रामपंचायत-79
शिवसेना ठाकरे - 20
शिंदे गट - 25
भाजप- 12
राष्ट्रवादी- 09
इतर पॅनल - 13
कल्याण तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली
यात 2 बिनविरोध झाल्या आहेत.
वाहोली – सलीम सरोले – उद्धव ठाकरे गट
आडीवली – राऊत कमलाकर दामोदर – उद्धव ठाकरे गट
केळणी – राजेश भोईर – अपक्ष
मामलोणी – कोर तुषाल दत्तात्रय – भाजप / उद्धव ठाकरे गट
रुंदे – नरेश चौधरी – भाजप
फळेगाव – भारती पाटील बिनविरोध- राष्ट्रवादी
उशीद – सुवर्णा भोईर बिनविरोध उद्धव ठाकरे गट
मुरबाड एकुण ग्रामपंचायत-35
शिवसेना - 5
शिंदे गट - 15
भाजप- 12
इतर-3
अंबरनाथ तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीवर भाजप - शिंदे गटाच्या युतीने कब्जा केला आहे.