ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: शिवसेना समर्थकांच्या पोस्टरची पळवा पळवी; पोलिसांत तक्रार दाखल - ठाणे बातमी

ठाण्यातील रायगड गल्ली भागात शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी पहिला पोस्टर लागला होता. हा पोस्टर लागल्यानंतर या पोस्टरची चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये (Thane) सुरू झाली. कारण ठाण्यातील जवळपास सर्वच शाखा प्रमुख विभाग, नगरसेवक यांनी आपला पाठिंबा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे.

Shiv Sena Poster
ठाणे पोस्टर
author img

By

Published : Jun 26, 2022, 12:49 PM IST

Updated : Jun 26, 2022, 1:32 PM IST

ठाणे - ठाण्यातील रायगड गल्ली भागात शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी पहिला पोस्टर लागला होता. हा पोस्टर लागल्यानंतर या पोस्टरची चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये (Thane) सुरू झाली. कारण ठाण्यातील जवळपास सर्वच शाखा विभाग प्रमुख, नगरसेवक यांनी आपला पाठिंबा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. अशा वेळी विरोधात लागलेल्या बॅनरमुळे शिवसेने मधल्या बंडाच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिक आणि लावलेल्या पोस्टरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली.

मध्यरात्री हा पोस्टर्स गायब झाला आहे. हे पोस्टर लावर्‍या या कार्यकर्त्यांनी या संदर्भात नौपाडा पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे नौपाडा पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. आणि यापुढे पोस्टर कोणी पळवला याची माहिती घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास नौपाडा पोलिस करत आहेत. तर, दुसरीकडे शिंदे गटात विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला कोर्टात आव्हान देण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यामुळे आता राजकारणासोबत कायदेशीर लढाई सुरू होणार असल्याचं दिसत आहे.

महाविकास आघाडीकडून सर्व बाजूंचा विचार केला जात असून प्रमुख नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खलबतं सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शिंदे गटाकडून कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेविषयी विचार विनिमय करण्यात येणार आहे.

हेही वाचा- Rebel Shivsena MLA : साहेब मध्यस्थी करा..बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांची चंद्रकांत खैरेंना फोनवरून विनंती

Last Updated : Jun 26, 2022, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.