ठाणे - गांजा हा अमली पदार्थ ( cannabis seized ) घेऊन निळ्या रंगाचा दूध वाहतूक करणारा टाटा टेम्पो हा भिवंडीहून ( Bhiwandi Crime ) ठाण्याकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-5 ( Crime Branch Unit ) च्या पथकाला मिळताच पथकाने कापूरबावडी अग्नीशमनदल येथे सापाला रचून टेम्पोसह 110 किलो गांजा आणि अंबालाल जगदिश जाट या आरोपीस बेड्या ( Accused arrested ) ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
विक्रीसाठी ठाण्याकडे जाताना पोलिसांच्या जाळ्यात - अटक ( arrested ) आरोपी अंबालाल जगदिश जाट ( रा. दिपज्योती रेसिडेन्सी, आशा हॉस्पीटल जवळ, काल्हेर, भिंवडी ) हा निळ्या रंगाचा टाटा टेम्पो घेऊन त्यातून गांजा हा अमली पदार्थ घेऊन, विक्रीसाठी ठाण्याकडे ( Thane ) जाताना पोलिसांच्या ( Police ) जाळ्यात अडकला आहे. दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी टेम्पो थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर टेम्पोमध्ये 11 गोण्या गांजा सापडला आहे. हा गांजा 110 किलो असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हस्तगत केलेल्या गांजाची किंमत 11 लाख रुपये असून, टेम्पो आणि आरोपीचा मोबाईल असा 16 लाख 7 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दापोली पोलिस पथकाला यश मिळाले आहे.
यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी दुधाच्या टेम्पोचा वापर - ही गांजाची वाहतूक करण्यासाठी दुधाच्या टेम्पोचा वापर केला जात होता. कारण दुधाच्या टेम्पोची सर्रास तपासणी होत नाही आणि याचाच फायदा घेत आरोपींनी दुधाच्या टेम्पोचा वापर गांजाच्या वाहतुकीसाठी केला आहे. अटक केलेला आरोपीचा अनेक राज्यात नेटवर्क असल्याचे पोलिसांना तपासात समोर आले असून, पोलीस आता या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल