ठाणे - ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ५ लाख रुपये घेताना अटक केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
डॉ. राजू मुरुडकर हे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असून त्यांनी १५ लाखाची मागणी केली होती. त्यापैकी ५ लाख रुपये घेताना ऐरोली येथून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा लावून अटक केली. मुरुडकर यांनी एका कंपनीकडून 15 लाख रुपयांची मागणी केली होती. ती कंपनी ठाणे महानगरपालिकेला व्हेंटिलेटर पुरवणार होती. एकूण कंत्राट 1.5 कोटींचे होते. त्याचे दहा टक्के लाच म्हणून मुरूडकर यांनी मागितले होते. एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऐरोली येथे हा व्यवहार होणार होता. त्याआधीच लाचलुचपत विभागाने तिथे सापळा लावून मुरुडकर यांना पकडले.
या याधी होत्या अनेक तक्रारी
पालिकेच्या या अधिकाऱ्याविरोधात अनेकदा तक्रारी येत होत्या. तीन खासगी रुग्णालय ते चालवत होते अशी एक तक्रार होती. त्यासोबत सरकारी डॉक्टर आणि इतरांना त्रास दिल्याच्या तकारीही होत्या. काही दिवसांपूर्वी शाई नसल्याचे कारण दिल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चांगलेच झापले होते.
हेही वाचा - अमेरिकेत राहणाऱ्या अंबाजोगाईच्या रूद्रवार दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, चार वर्षीय मुलगी सुखरुप