ETV Bharat / city

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवा- महापालिका आयुक्तांचे निर्देश

9 जून ते 12 जून 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे आदी घटना घडू शकतात. याबाबत करावयाच्या उपाययोजनाचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.

महापालिका आयुक्तांची भेट
महापालिका आयुक्तांची भेट
author img

By

Published : Jun 8, 2021, 10:26 PM IST

Updated : Jun 8, 2021, 10:54 PM IST

ठाणे - मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्शवभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

9 जून ते 12 जून 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे आदी घटना घडू शकतात. याबाबत करावयाच्या उपाययोजनाचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवा

हेही वाचा-पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट राजकीय तडजोडीसाठी का?, उदयनराजेंचा सवाल

आयुक्तांनी हे दिले निर्देश-
शहरात ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी भेट देवून आवश्यक ती कार्यवाही करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी सबमर्शीबल पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात प्रभाग समितीस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा-निलेश राणेंच्या वडिलांची हाऱ्या-नाऱ्याची गँग; मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार

शहरात रस्त्यावर झाडे पडल्यास ती तात्काळ हटविण्यासाठी मशीनरी आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देतानाच त्यांनी अतिवृष्टीमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास, भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे प्रभाग समितीमधील महापालिकेच्या शाळामध्ये तात्पुरती निवारा केंद्रे निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश सर्व सहाय्यक आयुक्तांना विपिन शर्मा यांनी दिले.

हेही वाचा-विमा कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालणारा 'बीड पॅटर्न', जाणून घ्या माहिती

टीडीआरएफ तैनात असणार

अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी टीडीआरएफच्या तीन टीम तयार ठेवावी तसेच एनडीआरएफ व आवश्यकता भासल्यास सैन्यदलाच्या पथकाशी समन्वय साधावा, असे सांगितले. शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत असल्याची तपासणी करावी तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलक त्वरीत हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

Last Updated : Jun 8, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.