ठाणे - कोरोनाच्या रुग्णांची संख्या ठाण्यात सातत्याने वाढत आहे. नवे ८३ रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या ठाण्यात ९९६ एवढी झाली आहे.
शुक्रवारी ठाणे पालिकेच्या हद्दीतील विविध प्रभाग समितीत आढळलेल्या रुग्णाची संख्या ८३ वर गेली आहे. यामध्ये माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत दोन नव्या रुग्णांची भर पडली आहे.
- वर्तकनगर प्रभाग समितीत शुक्रवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही.
- लोकमान्य नगर- सावरकरनगर प्रभाग समितीत शुक्रवारी सर्वाधिक ३२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे येथे एकूण रुग्णांचा आकडा २६१ वर पोहोचला आहे.
- नौपाडा कोपरी प्रभाग समितीत नव्या १२ रुग्णांची भर पडल्याने शुक्रवारी नव्या रुग्णांचा आकडा ९८ वर पोहचला आहे.
- उथळसर प्रभाग समितीत नव्या ७ रुग्णांची भर पडलेली आहे. येथे शुक्रवारी रुग्णांचा आकडा ८० वर पोहचला आहे.
- वागळे प्रभाग समितीत शुक्रवारी १० नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे. रुग्णांची संख्या १७७ वर पोहचली आहे.
- कळवा प्रभाग समितीत नव्या दोन रुग्णांची भर पडून रुग्णांचा आकडा ८० वर आला आहे.
- मुंब्रा प्रभाग समितीत शुक्रवारी १६ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा आता १५३ वर आहे.
- दिवा प्रभाग समिती गुरुवारी रुग्णसंख्या निरंक असताना शुक्रवारी मात्र दोन नव्या रुग्णांची भर पडली आहे.
हेही वाचा-'कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २९ हजार १००; आतापर्यंत ६५६४ बरे होऊन घरी'
ठाणे पालिका हद्दीत रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने चिंतेची बाब झाली आहे. शुक्रवारी कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सात इतकी आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७३वर गेली आहे. तर उपचाहर घेणाऱ्या रुग्णांपैकी ठाण्यात शुक्रवारी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४८ इतका आहे. तर प्रत्यक्षात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या ६७५ एवढी आहे.
ठाणे पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभाग समितीत कोरोनाचा गुणाकार झाल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. थोडक्यात ठाणे परिसर धारावीप्रमाणे झाल्याचे स्पष्ट संकेत रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसत आहेत. पावसाळ्यापूर्वी कोरोना संकट आटोक्यात आणणे हे ठाणे पालिका प्रशासनासमोर पुढे आव्हान आहे.