ठाणे - केंद्र सरकारने टाळेबंदीचे नियम शिथिल केल्याने ठाणे शहरात दुकाने उघडली आहेत. मात्र, ठाणेकरांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम धुडकावल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. केंद्र सरकारने टाळेबंदी 1खुली केल्यानेठाण्यात सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आली आहेत. येथील खारकर आळी बाजारपेठेतील दुकाने उघडताच ठाणेकरांनी एकच गर्दी केली. स्टेशनरी दुकाने, गिफ्ट गॅलरी व वस्तूंची दुकाने अशा सर्वच ठिकाणी ठाणेकरांनी गर्दी केली. सोशल डिस्टंसिंगचे नियम तोडत ग्राहकांनी खरेदी केली. नागरिकांनी तीन फुटांचे अंतरही खरेदी करताना ठेवले नाही. त्यामुळे ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या ठाणेकर आणि दुकानदारांवर महानगरपालिका काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.