ठाणे : ठाणे जिल्ह्यात (Gram Panchayat Election 2022) १५८ ग्रामपंचायतीपैकी २५ ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल झाला नसल्याने, या ठिकाणी निवडणुका होणार नाही. तर ३१ सरपंच बिनविरोध निवडणून आले. शिवाय १८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह सदस्यही बिनविरोध निवडणून आले आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचात म्हणून ओळख असलेल्या ग्रुप ग्रामपंचात पिपंळघर - रांजणोली या ग्रामपंचातीचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपा व ठाकरे गट एकत्र येऊन (Thackeray and BJP coming together) समझोता करत, भाजपाचा सरपंच ठाकरे गटाच्या सहकार्याने बिनविरोध (17 members including sarpanch were elected unopposed) निवडणून आला आहे. त्यामुळे गाव पातळीवरील नेते - कार्यकर्त्यांनी राजकीय सत्ता संघर्ष टाळल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
दोन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार : भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीपैकी २ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहे. त्यामध्ये अंबाडी नजीक असलेल्या दुधणी व श्रीमंत ग्रामपंचायत ओळख असलेल्या ग्रुप ग्रामपंचात पिपंळघर रांजणोली ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ही ग्रुप ग्रामपंचात मुंबई - नाशिक महामार्ग आणि भिवंडी - कल्याण मार्गावर असल्याने झपाट्याने नागरी संकूल वाढत आहेत. शिवाय टाटा आमंत्रा या टोलेगंज गृह संकुलामध्ये शेडको फ्लॅट आहेत. तर महिंद्रा हाऊसिंगचेही सर्वात मोठे संकुल उभारणीचे काम याच ग्रामपंचायत हद्दीत सुरु आहे. शिवाय ग्रामपंचायत हद्दीत दोन्ही महामार्गावर असल्याने ६ ते ७ आर्केस्टा लेडीज बारसह तेवढ्याच संख्येने बार अँड हॉटेल, आणि २० ते २५ ढाबे आहेत. शिवाय शेकडो गोदामेसह लहान मोठे उदयोग, कंपन्या, कारखाने असल्याने ग्रामपंचायतीला यापासून दरमहा लाखोंचा महसूल गोळा होतो. त्यामुळेच श्रीमंत ग्रामपंचायत अशीच ओळख निर्माण झाली आहे.
भाजपाचे १३ व शिवसेनेचे ४ सदस्य बिनविरोध आले निवडणून : ग्रुप ग्रामपंचात पिंपळघर रांजणोली हद्दीत ६ प्रभाग असून; यामध्ये १७ सदस्य आहेत. यापैकी भाजपाचे १३ तर (ठाकरे गट ) शिवसेनेचे ४ सदस्य बिनविरोध निवडणून आलेत. तर सरपंच पदासाठी (ठाकरे गट) शिवसेनेकडून सुजित भोईर आणि भाजपाकडून सचिन ठाकरे हे उमेदवार होते. मात्र दोघांमध्ये सत्ता संघर्ष नको म्हणून सरपंचाची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. त्याप्रमाणे आदी भाजपाचे सचिन ठाकरे हे सरपंच असतील, त्यानंतरच्या काळात ठाकरे गटाचे सुजित भोईर सरपंचपद भूषवणार आहेत. त्यामुळे भाजपाचे सचिन ठाकरे हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडणून आले. दरम्यान बिनविरोध सरपंचपदी निवडून आलेले सचिन ठाकरे यांच्याशी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संर्पक साधला असता, बिनविरोध निवडून आले. मात्र, ते बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची अधिक प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
घरपट्टीतुनही मिळतो लाखोंचा महसूल : ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमणात चाळी आणि छोट्या इमारती असून; यामध्ये परप्रांतीय कामगारांचा रहिवास सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत हद्दीत मतदारांची संख्या सहा हजार पाचशे एकेचाळीस आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३५ ते ४० हजार लोकसंख्येच्यावर नागरिक राहत आहेत. त्यामुळे घरपट्टीतुनही लाखोंचा महसूल ग्रामपंचायत प्रशासनाला मिळत आहे. तसेच रस्ते, पाणी, आणि इतर नागरी सुविधेसाठी विविध शासकीय योजनेच्या निधीतून राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.