ठाणे - शनिवारी पहाटेच्या साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अचानक चार फुटाचा साप शिरला. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना साप दिसताच एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी तातडीने याच परिसरात राहणारे सर्पमित्र प्रकाश गोयल यांना पाचारण करण्यात आले.
सर्पमित्राने पकडले सापाला - माहिती मिळताच सर्पमित्र प्रकाश हे घटनास्थळी आले. त्यांनी अत्यंत शांत चित्ताने काही वेळातच आरोपीच्या कोठडीतून सापास सुरक्षित पकडले. साप शिरला त्यावेळी पोलीस कोठीत आरोपी नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. हा साप धिवड जातीचा असून बिनविषारी आहे. या सापाला वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नजीकच्या जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र गोयल यांनी दिली आहे.