ETV Bharat / city

मद्यपी सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण; शिव समर्थ शाळेतील धक्कादायक प्रकार - मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोसाळकर

विद्यार्थ्याला शाळेतील सुरक्षा रक्षकानेच मारल्याचा निंदनीय प्रकार शहरातील शिव समर्थ शाळेत घडल्याने शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मद्यपी सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची प्रकार उघडकीस आला आहे
author img

By

Published : Sep 28, 2019, 1:22 PM IST

ठाणे - विद्यार्थ्याला शाळेतील सुरक्षा रक्षकानेच मारल्याचा निंदनीय प्रकार शहरातील शिव समर्थ शाळेत घडला. या प्रकारामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मद्यपी सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची प्रकार उघडकीस आला आहे

शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिव समर्थ शाळे जवळून मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोसाळकर जात असताना त्यांना काहीतरी गडबड सुरू असल्याचा आवाज आला. यावेळी त्यांना शाळेचा सुरक्षा रक्षक एका विद्यार्थ्याला बेदम मारत असल्याचे दिसले. तसेच यासंबंधी विचारपूस केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या संभाषणाला वादविवादाचे स्वरूप आले. या सर्व प्रकारानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाने मद्यपान केल्याचे समोर आले आहे. यामुळे मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून त्याला चोप देण्यात आला.

हेही वाचा मुंबई: मुले चोरी करण्याच्या संशयावरुन महिलेला जमावाकडून मारहाण

शाळेतील प्राध्यापकांनी सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी पाठवल्याने बंद असल्याचे सांगून या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

Intro:विद्यार्थ्याला मारणाऱ्या शिपायाला मनसे विद्यार्थी सेनेचा चोप..शाळेचे cctv बंद.. शिवसमर्थ शाळेतील धक्कादायक प्रकारBody:
एका विद्यार्थ्याला शाळेतील सुरक्षा रक्षकानेच मारल्याचा निंदनीय प्रकार ठाण्यातील नामांकित शिव समर्थ शाळेत घडल्याने शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आपण आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळेच्या स्वाधीन करतो आणि ते तिथे सुरक्षित आहेत असे समजतो, परंतु ठाण्यातील एका नामांकित शाळेत घडलेल्या प्रकाराने मुले किती सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातील अत्यंत नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिव समर्थ शाळेजवळून मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे अध्यक्ष अरुण घोसाळकर जात असताना त्यांना काहीतरी गडबड सुरु असल्याचा आवाज आला. त्यांनी गेट मधून आत पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. ज्याला मुलांच्या सुरक्षेसाठी नेमला आहे तोच नराधम सुरक्षा रक्षक एका छोट्याश्या विद्यार्थ्याला बेदम मारत होता. हे सहन न झाल्याने घोसाळकर आत गेले व त्यांनी याबाबत जाब विचारला असता, सदर सुरक्षा रक्षकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकाराने चिडलेल्या घोसाळकर यांनी त्याची गचांडी पकडताच हा सुरक्षा रक्षक चक्क दारू पिलेला असल्याचे त्यांना कळले. त्यांनी त्याला बेदम चोप देत, मुलांच्या पालकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना घडला प्रकार सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे शाळेचे सर्व cctv बंद असल्याने मुलांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. असले प्रकार यापूर्वी अनेकदा घडल्याचे घोसाळकर यांनी सांगत प्रत्येक पालकाने महिन्यातून एकदा तरी शाळेत भेट देऊन सगळी माहिती घ्यावी. शिक्षक, सुरक्षा रक्षक या सगळ्यांची कसून चौकशी करावी जेणेकरून असले प्रकार भविष्यात घडणार नाहीत. शाळेच्या प्राध्यापकांनी cctv दुरुस्ती साठी गेल्यामुळे बंद आहेत असे सांगत संपूर्ण प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला.
BYTE - अरुण घोसाळकर (मनसे विद्यार्थी सेना ठाणे अध्यक्ष)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.