ETV Bharat / city

सचिन वाझे शस्त्रक्रियेसाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल.. - मनसुख हिरेन

अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात आज (मंगळवार) दुपारी दाखल करण्यात आले आहे . मनसुख हिरेन व मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात वाझे यास हृदयविकाराचा त्रास होत असल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती. त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sachin Waze
Sachin Waze
author img

By

Published : Aug 31, 2021, 6:26 PM IST

Updated : Aug 31, 2021, 7:42 PM IST

ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडा बरोबरच मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला. या प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयात नेमके का दाखल..

विशेष म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणातल्या आरोपीवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले, हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडीसारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे .

हे ही वाचा - Antilia Explosives Scare : सचिन वाझेवर खासगी रुग्णालयात होणार उपचार ! NIA ची मागणी न्यायालयाने फेटाळली

सचिन वाझे याच्या हृदयात ब्लॉकेज..

सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी ( आज ) चार वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सचिन वाझे यांच्या हृदयात ब्लॉकेज असून त्यावर अँजिओग्राफी व गरज पडल्यास अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची महिती दिली जात आहे. या ठिकाणी रुग्णालयाबाहेर स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा, ठाणे, नवी मुंबई व मुंबई येथील पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Last Updated : Aug 31, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.