ठाणे-आजपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे तृतीयपंथीयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कल्याण पूर्वेतील तृतीयपंथी समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मदतीचा हात देत जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तृतीयपंथी समाजाला आता एक वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे प्रभागातील नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी या समाजाला लॉकडाऊनच्या सुरवातीला अन्नधान्य वाटप केले होते त्यांच्याच प्रयत्नातून राष्ट्रीय स्वंयसेवक संघातर्फे 55 तृतीयपंथियांना डाळ, तांदुळ, तेल, मीठ जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
जीवनावश्यक वाटपावेळी नगरसेविका रेखा चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्पेश दीक्षित,चंद्रकांत बोरसे,मनोज वाडियार, गणेश मिश्रा उपस्थित होते.