ठाणे - केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या अग्निपथ या योजनेविरोधात संपूर्ण भारतभर आंदोलन व आक्रोश दिसत असताना आज ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर येऊन रास्ता रोको केला व या रास्ता रोकोमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
हेही वाचा - सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कंत्राटदार कोण..? - मंत्री जितेंद्र आव्हाड
या रास्ता रोकोमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर जवळपास 10 ते 15 मिनिटे वाहतूक कोंडी झालेली या ठिकाणी पाहायला मिळाले. आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारने केलेल्या या योजनेविरोधात हे आंदोलन असून, केंद्र सरकारने गरीब मुलांचा जर विचार केला नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात भव्य आंदोलन केंद्र सरकार विरोधात छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिला.
महाराष्ट्रात आक्रमक आंदोलन नाहीत - देशातील इतर राज्यांमध्ये ज्याप्रकारे अग्निपथ योजनेविरोधात आक्रमक आंदोलने झाली, त्याप्रकारे महाराष्ट्रात कुठेही आक्रमक आंदोलन झाले नाही. सुदैवाने कायदा-सुव्यवस्था असल्यामुळे ही आंदोलने टाळता आली असून त्याचा परिणाम राज्यातील सुस्थितीवर आहे.
हेही वाचा - Thane : ३१ मेची अंतिम मुदत संपूनदेखील ठाण्यातील नाल्यांची परिस्तिथी 'जैसे थे'; नागरिकांमध्ये संताप