ETV Bharat / city

रिक्षाचालकाचा 40 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ठाणे बलात्कार

रिक्षाचालकाने ठाणे येथील एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पोलीस तक्रारीनंतर रिक्षाचालक ब्रिज मोहन गिरी(40) याला अटक करण्यात आली आहे.

Rickshaw driver rapes 40-year-old woman arrested by Vikhroli police
रिक्षाचालकाचा 40 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
author img

By

Published : Oct 30, 2021, 7:24 AM IST

ठाणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. एका रिक्षाचालकाने ठाणे येथील एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ भांडुप येथे खाडी परिसरातील झुडुपात नेऊन रिक्षाचालकाने या महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या पोलीस तक्रारीनंतर रिक्षाचालक ब्रिज मोहन गिरी(40) याला अटक करण्यात आली आहे.

ठाणे येथील एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार

ठाण्यात राहणाऱ्या चाळीस वर्ष महिलेने काही दिवसांपूर्वी रिक्षामधून प्रवास करताना तिच्या नातेवाईकांशी मोबाईल वरून ती नोकरीच्या शोधात असल्याच्या संदर्भात संभाषण केलं होतं. नेमकं हेच संभाषण या रिक्षाचालकाने ऐकलं आणि त्याने तिला नोकरी देण्याचा आमिष देत तिचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर शनिवारी या रिक्षाचालकाने संबंधित महिलेला फोन करून तिला नोकरीला लावण्यासाठी एका इसमाची भेट घालायची असल्याचं आमिष दाखवलं आणि तो त्या महिलेला भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या कांदळ वनात दुपारच्या वेळी घेऊन गेला.

त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि जर कोणाला याची कल्पना दिली. तर जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याने या महिलेला पुन्हा ठाण्यात नेऊन सोडलं. यावेळी त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील हिसकावून घेतलं आणि त्या ठिकाणाहून तो फरार झाला. पीडित महिलेने वागळे पोलीस स्टेशन गाठून याची माहिती दिली आणि अखेर वागळे पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून विक्रोळी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग केला. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर वसईवरून रिक्षाचालक ब्रिज मोहन गिरी याला बेड्या अटक करण्यात आली. दरम्यान ब्रीजमोहनला विक्रोळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

हेही वाचा - अभिनेत्री जुही चावलाच्या 'या' एका चुकीमुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.