ETV Bharat / city

50 टक्के नालेसफाई झाल्याचा आयुक्तांचा दावा, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे

author img

By

Published : May 29, 2022, 2:16 PM IST

Updated : May 29, 2022, 3:07 PM IST

दरवर्षी हजारो घरांचे नुकसान करत शहरात पाणी साचतं घरांमधल्या लाखो रुपयांच्या सामानाचे नुकसान होतं महानगरपालिकेकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही मात्र ठेकेदार दरवर्षी दिल्या काढून मोकळे होतात कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना कोणताही दंड होत नाही आणि याचाच फायदा घेत दरवर्षी तेच ठेकेदार तीच काम करत असतात आता तर ठेकेदार आणि महापालिका अधिकारी यांचा संगनमत होऊन काम देखील वाटून घेऊन नालेसफाई होत असल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळते.

realty check of thane muincipla corporation pre monsoon nalesafai work
50 टक्के नालेसफाई झाल्याचा आयुक्तांचा दावा, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे

ठाणे - ठाणे शहरात शेकडो किलोमीटर अंतराचे नाले दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सफाईचे काम महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून केले जातात यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खरच नागरिकांच्या उपयोगी पडतो का एक मोठा प्रश्न समोर आहे कारण दरवर्षी ठाण्यात पाणी तुंबण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नाही.
यावर्षी जवळपास दहा कोटी रुपये ठाणे महानगरपालिका नालेसफाई वरती खर्च करणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बिपीन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ठाणे शहरांमधल्या अनेक नाल्यांची पाहणी केली आणि या सर्व ठिकाणी साफसफाई सुरू असून 50 टक्के नाले हे साफ झाल्याचे सांगितले. पालिकेच्या आयुक्तांचा हाच दावा किती खरा आहे हे पाहण्यासाठी ठाण्यातल्या एका प्रमुख नाल्यावर ती गेल्यावर ती तेथील परिस्थिती या नालेसफाईची पोलखोल करताना दिसली. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम सुरू झालेलं नव्हतं नाले प्रचंड भरलेल्या आढळले आणि या मुळे या परिसरामध्ये पाणीदेखील भरणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

31 मे महानगरपालिकेची नालेसफाईचे डेडलाईन - 31 मे ही सर्वच महानगरपालिकेची नालेसफाईचे डेडलाईन असते. आधी शहरातील सर्व नालेसफाई व्हावी, असे नगरविकास विभागाचे आदेश असतात मात्र नालेसफाई ही प्रत्यक्षात उशिराने सुरू होऊन पाऊस सुरू होण्याची वाट पाहत असते. कारण ठेकेदार आपले पैसे वाचवण्यासाठी विना कामगार कचरा पावसाच्या पाण्याने वाहून जावा यासाठी नालेसफाई उशिराने सुरू करतात आणि यामुळेच पाऊस सुरू झाला की शहराच्या विविध भागात पाणी साचते. त्यामुळे हजारो नागरिकांना त्याचा परिणाम भोगावा लागतो.

दरवर्षी तेच ते ठेकेदार - दरवर्षी हजारो घरांचे नुकसान करत शहरात पाणी साचतं घरांमधल्या लाखो रुपयांच्या सामानाचे नुकसान होतं महानगरपालिकेकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही मात्र ठेकेदार दरवर्षी दिल्या काढून मोकळे होतात कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना कोणताही दंड होत नाही आणि याचाच फायदा घेत दरवर्षी तेच ठेकेदार तीच काम करत असतात आता तर ठेकेदार आणि महापालिका अधिकारी यांचा संगनमत होऊन काम देखील वाटून घेऊन नालेसफाई होत असल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळते.

नागरिकांचा ही हलगर्जीपणा - शहरातील कचरा हा मोठ्या प्रमाणात शहरातल्या नाल्यात नागरिक फेकतात त्यामुळे नाले तुंबतात आणि त्याचा परिणाम पावसाळ्यात शहरात पाणी भरण्यावर होतो जर कचरा नाल्यात फेकला नाही तर ही समस्या उद्भवणार नाही मात्र नागरिकांच्या या हलगर्जीपणामुळे त्यांना त्याचा फटका बसतो हे चित्र आतापर्यंत पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी कचरा हा योग्य ठिकाणी टाकावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते.

Last Updated : May 29, 2022, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.