ETV Bharat / city

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमचे चित्र पालटले.. तब्बल ३५ वर्षांनी रंगणार रणजीचे सामने, रोहित शर्माची क्रिकेट अॅकॅडमीही लवकरच - दादोजी कोंडदेव स्टेडिअम

ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानावर ( Dadoji Konddev Stadium) तब्बल 35 वर्षानंतर विजय हजारे करंडकाचे सामने होणार आहेत. बीसीसीआयची अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडकाचे पाच सामने दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर रंगणार आहेत. यापूर्वी दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर ३५ वर्षांपूर्वी, १९८६ साली रणजी करंडक सामने झाले होते. त्याचबरोबर टी-20 मधील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची क्रिकेट अॅकॅडमी (Rohit Sharma's Cricket Academy in thane ) याच मैदानावर सुरू होणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात आंतरराष्ट्रीय व आयपीएलचे सामनेही होणार आहेत.

Dadoji Konddev Stadium
Dadoji Konddev Stadium
author img

By

Published : Dec 7, 2021, 9:18 PM IST

ठाणे - एकेकाळी पांढरा हत्ती अशी ओळख असलेल्या दादोजी कोंडदेव मैदानाचे ( Dadoji Konddev Stadium) चित्र पालटले असून तब्बल ३५ वर्षानंतर या मैदानात बीसीसीआयची अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडकाचे पाच सामने या स्टेडिअमवर रंगणार आहेत. त्याच बरोबर रोहित शर्मा सारख्या मोठ्या क्रिकेटपटूची क्रिकेट अॅकॅडमी (Rohit Sharma's Cricket Academy in thane ) लवकरच याच मैदानावर सुरू होणार आहे. ठाणेकरांसाठी या दोन्ही गोष्टी आनंददायक असून ठाणे व मुंबई मधील खेळाडूंसाठी मोठा प्लॅटफॉर्म यामुळे मिळणार आहे.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमचे चित्र पालटले

आंतरराष्ट्रीय व आयपीएलचे सामनेही लवकरच -

८ ते १४ डिसेंबर या कालावधीत विजय हजारे करंडक सामने होणार आहेत. दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर ( Dadoji Konddev Stadium) तब्बल ३५ वर्षांनी बोर्ड फॉर कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया अर्थात बीसीसीआयचे (एमसीए) सामने रंगणार आहेत. बीसीसीआयची अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडकाचे पाच सामने दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर रंगणार आहेत. यापूर्वी दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर ३५ वर्षांपूर्वी, १९८६ साली रणजी करंडक सामने झाले होते. त्यानंतर काही कारणास्तव या स्टेडिअमवर स्पर्धात्मक क्रिकेट सामने होऊ शकले नव्हते. परंतु, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदींनी एमसीएच्या सामन्यांसाठी आवश्यक असलेले बदल या मैदानात केल्यामुळे विजय हजारे करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सामने आता या मैदानात होणार आहेत. तर आंतरराष्टीय खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात इंटरनॅशनल व आयपीएलचे सामनेही या मैदानात पाहायला मिळतील. त्याच बरोबर रोहित शर्मा सारख्या मोठ्या क्रिकेटपटूची क्रिकेट अॅकॅडमी (Rohit Sharma's Cricket Academy in thane) लवकरच याच मैदानात सुरु होणार आहे.

Dadoji Konddev Stadium
दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे
अधिकाऱ्यांची मेहनत आली फळाला -
बीसीसीआयच्या विजय हजारे करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सामने दादोजी कोंडदेव स्टेडिअम येथे होणे ही चांगली गोष्ट असून ठाणे महापालिकेने यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाण्यातील होतकरू क्रीडापटूंना सराव आणि प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका कटिबद्ध असून अशा प्रकारचे स्पर्धात्मक सामने स्टेडिअममध्ये आयोजित केल्यामुळे येथील इन्फ्रास्ट्रक्चर अधिक मजबूत होईल आणि स्थानिक क्रीडापटूंना त्याचा चांगला फायदा होईल, तर रात्रीच्या सामने होण्यासाठी विशेष लाईटची गरज आहे .यासाठी २० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन ही यावेळी शिंदे यांनी दिलं आहे.
Dadoji Konddev Stadium
दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे
8 डिसेंबरपासून होणार रणजी सामने -
मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठाणे महापालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. बुधवारपासून पहिला सामना ओडिसा विरोधात विदर्भ असा रंगणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.