ETV Bharat / city

Thane Mental Hospital: कुटुंबियांच्या भेटीसाठी आसुसले ठाण्यातील मनोरुग्ण; मात्र नातेवाईकांची रुग्णांकडे पाठ - Psychopaths

बहिण भावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन ( Rakshabandhan ) जवळ येत आहे. परंतु ठाण्यातील मनोरुग्ण ( Thane Mental hospital ) रक्षाबंधणासाठी आपल्या कुटुंबियांची वाटच पाहत आहेत. पण त्यांना भेटायला कुणीच येत नाही.पण त्यांच्या प्रतीक्षेचे ओझे कमी करण्यासाठी ठाणे मनोरुग्णलयात मनोरुग्णांच्या ( Psychiatric Thane ) हस्ते राख्या बनवण्यात येत आहे. त्यांमुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठ्या प्रमाणात मदत देखील होत आहे.

Thane Mental hospital
ठाणे मनोरुग्णलय
author img

By

Published : Aug 6, 2022, 4:34 PM IST

Updated : Aug 6, 2022, 5:33 PM IST

ठाणे - रक्षाबंधन ( Rakshabandhan ) म्हटलं की सण येतो तो बहिण भावाचा आणि याच सणासाठी बऱ्याच मैलावरून भाऊ आपल्या बहिणीला भेटायला येत असतो. परंतु अनेक वर्षे रक्षाबंधणासाठी मनोरुग्णतील बहिणी आणि भाऊ आपल्या कुटुंबियांची वाटच पाहत आहेत. आपल्या घरात मनोरुग्ण ( Psychiatric Thane )असला तर आपण त्यांना मनोरुग्ण इस्पितळात ( Thane Mental hospital ) भरती करतो परंतु बऱ्या झालेल्या रुग्णांनाही कुटुंबीय घ्यायला येत नसल्याने नाईलाजाने या बऱ्या झालेल्या रुग्णांना देखील नाईलाजास्तव इथेच राहावे लागते आहे.

मनोरुग्णांच्या हस्ते बनवल्या राख्या - रक्षाबंधन सण जवळ येत असून सर्व ठिकाणी याची लगबग सुरु आहे. परंतु मनोरुग्ण इस्पितळातील चित्र वेगळे आहे. वर्षानुवर्ष वाट पाहणारे भाऊ-बहीण कुटुंबाच्या प्रतीक्षेतच आहेत. परंतु यांच्या प्रतीक्षेचे ओझे कमी करण्यासाठी मनोरुग्ण इस्पितळात मनोरुग्णांच्या हस्तेच राख्या बनवण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्ष मनोरुग्णांच्या हस्ते या राख्या बनवल्या जातात व त्यांची विक्री देखील केली जाते. याच राख्यांसोबत कंदील, कापडी पिशव्या, बटवे, रुमाल, इत्यादी सुद्धा बनवले जातात. यात सर्व गोष्टींमुळे मनोरुग्णातील ताण व तणाव कमी होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात मदत देखील होते. याच गोष्टी लक्षात घेऊन ठाणे मनोरुगणात कडून विविध प्रकारच्या राख्या या बनवल्या जातात.

राख्या बनवण्यात आम्हाला खूप आनंद होतो. अनेक वर्ष आम्ही राख्या बनवतो. हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व मदतनीस सेविका आम्हाला योग्य प्रकारे शिकवण देतात. तसेच आम्ही कापडी पिशव्या ,कंदील , अन्य साहित्य देखील बनवतो. प्रत्येक सण आला की घराची आठवण येते. घरातले कुटुंबीय भेटायला येतील अशी अशा असते.परंतु यापैकी काहीच न होता आमच्या पदरी निराशाच पडते. भावाची खूप आठवण येत असून रक्षाबंधनानिमित्त भाऊ भेटायला येईल असे वाटत आहे. परंतु राखी बनवण्याच्या कामामुळे विचार करण्यात दिवस न घालवता आम्ही आमचा पूर्ण दिवस याच कामांमध्ये व्यस्त करून घालवतो. असे यावेळी रुग्णालयातील मनोरुग्ण बहिणी बोलत होत्या. तर ज्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करत असतो, वेळ घालतो त्याचप्रमाणे घरात असणाऱ्या गृहिणींनी देखील अशा प्रकारची काम केले ,तर त्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतो.असा मोलाचा संदेश देखील यावेळी मनोरुग्ण रुग्णालयातील बहिणीने दिले आहे.

रुगणालाय प्रशासन घेतात विशेष काळजी - मनोरुग्णांची सेवा ठाण्यातील या इस्पितळात होत असून अनेक वर्ष हे मनोरुग्ण याच रुग्णालयात आहेत. योग्य उपचार घेऊन व योग्य काळजी घेऊन मनोरुग्ण आपल्या त्रासांवर मात करत असतात. त्यापैकी अनेक मनोरुग्ण हे 95 टक्के बरे झाले असून सुद्धा कुटुंबीय त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे मनातून झालेल्या कच्चीकरणावर मात हॉस्पिटल होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन करताना दिसून येतात. परंतु सणाच्या दिवशी मात्र घरच्यांची आठवण येत असून सुद्धा कुटुंबीय भेटायला येत नाहीत. याचे दुःख आपल्याला समजण्या व उमाजण्याच्या पलीकडचेच आहे.

हेही वाचा : Adivasi Din: जागतिक आदिवासी दिन; महाराष्ट्रातील आदिवासींची संस्कृती, घ्या जाणून

Last Updated : Aug 6, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.