ठाणे - ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारो युवक युवतींना डीजेच्या तालावर नाचवणाऱ्या आणि हुक्कासह इतर सुविधा देणाऱ्या कोठारी कंपाऊंडमधील MH 04 लॉजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. लॉजच्या मालकावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
MH 04 या लॉजवर पोलिसांनी कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे असलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करून नियमांना फाटा देताना दिसत आहेत. ठाण्यात असणाऱ्या MH 04 या लॉजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या लॉजवर गर्दी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी संबंधित कारवाई केली आहे.
'कोरोनाचे नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का?'
ठाण्यात अनेक बार आणि लॉज हे सर्रासपणे चालू असतात. यामध्ये कोरोना नियमांचे पालन केले जात नाही. प्रशासनाच्या नियमावलीचा फज्जा उडवला जात असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न देखील सामान्य नागरिक विचारत आहेत. सर्रासपणे सुरू असलेल्या लॉज आणि बारवर प्रशासन कारवाई करणार का? असा देखील प्रश्न नागरिक विचारत आहेत. एका लॉजवर कारवाई झाली, यासारख्या सुरू असणाऱ्या अनेक लॉजवर प्रशासन कारवाई करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई