ETV Bharat / city

लाखो रुपये खर्च करूनही भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपूल खड्ड्यांत - Pits on Rajiv Gandhi flyover

दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील खड्ड्याने पुन्हा डोकेवर काढल्याने आतापर्यंतचा कोट्यवधींचा निधीही खड्ड्यात गेल्याची चर्चा या पुलावरून जाणारे वाहनचालक करताना दिसत आहे.

राजीव गांधी उड्डाणपूल
राजीव गांधी उड्डाणपूल
author img

By

Published : Jun 22, 2021, 7:47 PM IST

Updated : Jun 22, 2021, 7:57 PM IST

ठाणे - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील खड्ड्याने पुन्हा डोकेवर काढल्याने आतापर्यंतचा कोट्यवधींचा निधीही खड्ड्यात गेल्याची चर्चा या पुलावरून जाणारे वाहनचालक करताना दिसत आहे.

पुलाच्या दुरुस्तीवर सुरुवातीपासून दुर्लक्ष

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले. मात्र अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नाही. या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाणपूल सुरवाती पासून नादुरुस्त असल्याने याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे.

तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड

तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. तर या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे 7 कोटी रुपये मंजूर झाल्यावर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. परंतु केवळ धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती पूर्ण झाली आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून या उड्डाणपुलावार मोठं-मोठे खोल खड्डे पडल्याने या उड्डाणपुलावरून येणाऱ्या करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांची ये-जा करणारे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर खड्ड्यात आपटून वाहने नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून पुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी चालकांनाकडून केली जात आहे.

Last Updated : Jun 22, 2021, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.