ठाणे - ठाण्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येचा आकडा हजारीपार गेला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील बेडस फूल्ल होऊ लागले आहेत. सध्या ठाण्यात ७३ टक्के बेडस रुग्णांनी भरले असून २७ टक्के बेड्स रिकामे आहेत. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या काही दिवसात रुग्णांना बेडस मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहावे लागणार आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बेडसची संख्या वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
शहरात पालिका आणि खासगी अशी एकूण २२ कोरोना रूग्णालये आहेत, त्यामध्ये एकूण २ हजार ७४७ बेडसची क्षमता आहे. त्यापैकी १८४५ बेडस फुल्ल आहेत तर ७५० बेडस रिकामे आहेत. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बेडस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी रूग्णांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळत आहेत. मात्र प्रत्यक्षात बेडस रिक्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हेात आहे. सध्या शहरात कोरोनाचे ८ हजार सक्रिय रूग्ण आहेत. मात्र त्यातील लक्षणे नसल्यामुळे अनेक रूग्ण घरीच तसेच विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली असून बेडस वाढविण्याची तयारी सुरू केली आहे.
मार्च महिन्याच्या सुरूवातीला पाचशे ते सहाशे रूग्ण आढळून येत असतानाच, २४ मार्चनंतर रूग्ण संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रूग्णांचा आकडा थेट एक हजार पार झाला आहे. २८ मार्चला सर्वाधिक ११७९ रूग्ण आढळून आले. शहरातील सर्वाधिक रूग्ण संख्या ठरली आहे. २५ मार्च ते २९ मार्च या चार दिवसात सुमारे ४ हजार रूग्ण वाढले आहेत. रूग्ण वाढीचा वेग हा चिंताजनक ठरत आहे. आतापर्यंतच्या कोरेाना रूग्णांची एकूण संख्या ७६ हजारावर पेाहचली असून त्यापैकी ६६ हजार २३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रूग्ण बरे हेाण्याचे प्रमाण ८८ टक्के आहे. आतापर्यंत १४३९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेकडून दररेाज चार ते पाच हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत १२ लाख नागरिकांच्या चाचण्या पार पडल्या आहेत.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन
बेडस क्षमता रिक्त
जनरल बेडस १२२३ ७१८
ऑक्सिजन बेडस १०८१ ११५
आयसीयू बेडस ४४३ ९९
व्हेंटिलेटर १९३ १६३
हॉस्पिटल बेडस क्षमता रिक्त बेडस
कौशल्य हॉस्पिटल ७० ---
वेदांत हॉस्पिटल ७० ५
सफायर ७७ १
ठाणे हेल्थ केअर ५३ -----
टायटन ३५ १
एकता हॉस्पिलट २५ ३
बेथनी ५७ -----
ठाणे कोवीड १०१० १९८
स्वयंम ३० ---
अवेन्यू वेदांत १३० १
हायलॅण्ड २७ ---
विराज १८ १८
वेदांत मल्टीस्पेशालिटी : १३० ३९
कौसा स्टेडिअम १०० ७०
ठाणे नोबल ३३ ---
होरीझन प्राईम ७५ ६
मेट्रो पोल ७१ ---
शिवनेरी २५ २
दिया हॉस्पीटल ३१ २
अॅटलॅनटिस २५ ६
ब्रह्मांड मल्टीस्पेशालिटीह : २४ १०
पार्किंग प्लाझा : ३०० २२१
हेही वाचा - महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू मराठवाड्यात, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये उच्चांक