ETV Bharat / city

Online Gambling : विद्यार्थ्यांचे ऑनलाईन जुगाराकडे आकर्षण वाढले, ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर तरुणाईची गर्दी - Online gambling on smartphones

ऑनलाईन जुगाराच्या ( Online Gambling ) अड्ड्यांवर अनेक जण खेचले जात आहेत. यात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश तर आहेच, विशेष म्हणजे ऑनलाईन जुगार खेळाकडे तरुणाईला आकर्षित ( Attracting youth to online gambling ) होत आहेत.

Online Gambling
ऑनलाइन जुगार
author img

By

Published : Jul 27, 2022, 6:34 PM IST

ठाणे - स्मार्टफोनवर सद्या ऑनलाईन जुगाराचा ( Online Gambling ) सुळसुळाट पहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर अनेक जण खेचले जात आहेत. यात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश तर आहेच, विशेष म्हणजे ऑनलाईन जुगार खेळाकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ( Student attraction towards online gambling ) बहुतांश टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध अभिनेते, मॉडल हे जाहिरातीत झळकतांना दिसत आहे. यामुळे अशा जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे.

सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल .. एकीकडे सायबर पोलिसांच्या ( Cyber Police ) ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत गेल्या आहेत. पण, कायद्याने बंदी नसल्याने विविध भागांत ऑनलाईन जुगाराचे अड्डे सर्रास सुरु आहेत. यात तरूणाई दिवसेंदिवस अडकत चालली आहे. यातूनच तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. अशा जुगारावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डोंबिवली विधानसभा क्षेत्र, कमिटीचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील ( Bhalchandra Patil ) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठिकठिकाणी थाटले ऑनलाईन मटका/जुगाराचे अड्डे ... या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी पोलिसांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे. या संदर्भात पाटील यांनी ऑनलाईन मटका/जुगार अड्डे चालविणाऱ्या काही माफियांची नावेही या निवेदनात नमूद केली आहेत. डोंबिवलीत ललित पटेल, प्रकाश पटेल हे दोन कुख्यात मटका किंग असून या जुगार माफीयांनी संगनमत करून लॉटरीच्या नावाखाली शहरात ऑनलाईन ऑनलाईन मटका/जुगाराचे अड्डे थाटले आहेत. शहरातील चौकाचौकांतील दुकानांतून सुरू असलेल्या या अड्ड्यांवर लोकांची दररोज लाखो रूपयांची फसवणूक करत आहे.

हेही वाचा - Teachers car accident : शाळेत साहेब आल्याचे कळताच वेगात निघालेल्या 'त्या' शिक्षिकांच्या गाडीला अपघात तीघी जखमी

जुगार माफियांनी ऑनलाईन मटका चालवण्याचे बनवले स्वॉफटवेअर.. विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यांत या जुगार माफियांनी स्वतः ऑनलाईन मटका चालवण्याचे स्वॉफटवेअर बनवले आहे. त्यांनी जुगार-मटक्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांची फसवणूक करून कोट्यवधीची माया जमवली आहे. शहरातील विविध भागातील जुगार माफियांनी अशा प्रकारे अनधीकृतपणे व्यवसाय करून शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडवत आहेत. गेल्याच महिन्यात यापैकी एकावर डोंबिवलीच्या विष्णूनगर, तर दुसऱ्यावर कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

जुगार माफीया पोसतात गुंडाच्या टोळ्या.. ऑनलाईन जुगाराच्या अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून हेच जुगार माफीया कुप्रसिद्धी गुंड टोळ्या पोसत आहे. मात्र, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या माफीयांनी आपल्या अड्ड्यांचे जाळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आंबिवली, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी रेल्वे स्टेशन परिसरात, तसेच सर्वसामान्यांची लोकवस्ती असलेल्या भागात थाटले आहेत. या जुगारात महाविद्यालयीनच नव्हे तर, शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली असून देशाचे उज्वल भवितव्य उध्वस्त होताना दिसत आहे.

हेही वाचा - औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद पोहोचला उच्च न्यायालयात, 1 ऑगस्टला होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.