ठाणे - एका अनोखळी तरुणीने फेसबुकवर तरुणाला फ्रेंड रिक्वेट पाठवली. त्यांनतर दोघांमध्ये मैत्री होऊन त्या तरुणीने त्या तरुणाशी प्रेमाचे नाटक करून, त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी तरुणीने त्याचा व्हाट्सअप नंबर मिळवला. त्यांनतर व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगवरून त्या तरुणीने ऑनलाइन अंगप्रदर्शन करून त्याला 'सेक्स' करण्याची ऑफर दिली. त्यामुळे तोही ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगवर त्या तरुणीसमोर विवस्त्र झाला. त्याचवेळी त्याची फसवणूक झाली. यानंतर या तरुणाचे विवस्त्र अवस्थेतील काही व्हिडीओ, काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवली. यानंतर तो तरुण चांगलाच घाबरला. त्याने ठाणे सायबर गुन्हे शाखेला याबाबत माहिती दिली. दरम्यान, ठाणे सायबर सेल पोलिसांनी याप्रकरणी शोध सुरू केला आहे.
पीडित तरुणाच्या मित्रामुळे प्रकार उघडकीस
जुलै महिन्यात पीडित तरुणाची फसवणूक झाल्यानंतर त्याने मोबाईल व फेसबुक बंद केले. त्यांनतर पीडित तरुणाने घडलेला प्रकार मित्राला सांगितला. त्याच तरुणीने पीडित तरुणाच्या मित्रालाही फेंड रिक्वेस्ट पाठवलेली होती. या मित्राने त्या तरुणीची रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर गोड बोलून फेसबुक आयडीची माहिती गोळा केली. त्या तरुणीने त्यालाही व्हाटसअप नंबर विचारला, त्याने तो दिला. त्यानंतर 14 जुलै 20 21 रोजी त्या तरुणीने त्यालाही मेसेंजरवर मेसेज टाकले. तसेच, तीचे डिटेल्स काढायचे होते, म्हणून तीचा व्हाटसअप नंबर मित्राने मागवून घेतला. त्यानुसार त्यालाही व्हाटसअप कॉलवर तीचे उघडेनागडे शरीर अंगप्रदर्शन दाखवले. तीने त्यालाही बाथरुममध्ये जावून तसे करण्यास सांगितले. त्यांनतर लगेच 3 मिनिटांत त्या तरुणीने स्र्किनशॉट काढून त्याच्याही फेसबुक प्रोफाईल. तसेच, व्हाटसअप कॉलवरील फोटो आणि फसेबुकला असलेले मित्र मैत्रिणींचे फोटोही पाठवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
पुरावे केले गोळा
अनेक तरुणांना ब्ललॅकमेल करणारी सिमा शर्माचा मो.क. 9565671533; गुगलपे, फेसबुक आयडी https://www.facebook.com/profile.php गोळा केले. ठाणे सायबर क्राईमकडे लेखी तक्रार केली.
डोंबिवलीतील ठाकुर्ली भागातील प्रकार
लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून विविध मार्गाने फसवणूक करणारी टोळीही सक्रिय झाल्याच्या, अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच नाविनपिढी वॉट्सअँप, इन्स्टाग्राम व फेसबुक अश्या अनेक अँपचा वापर करीत आहे. या माध्यमातून नवीन मित्र बनवतात, पण ते कोण आहे? काय करतात? यावर लक्ष न देता त्यांच्या बोलण्यावरून प्रभावीत होतात. त्यानंतर दोघांमधील झालेल्या संवादाचा स्क्रिनशॉट काडून त्यांना ब्लॅकमेल करतात. असाच एक प्रकार डोंबिवलीतील ठाकुर्ली भागात राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला. हा सगळा प्रकार मित्राच्या माध्यमातून वकील प्रदीप बावस्कर यांना सांगितला. त्यानंतर बावस्कर यांनी त्या तरुणाला धीर देत. त्या तरुणीचा अकाऊंट नंबर व फेसबुक आयडी तसेच, पुरावे गोळा करून डोंबिवली एसीपी, कल्याण डीसीपी आणि ठाणे सायबर क्राईमकडे लेखी तक्रार दाखल केली.
बदनामीच्या भीतीने अनेकजण 'ब्लॅकमेलर'च्या जाळ्यात
सोशल मीडिया द्वारे तरुण-तरुणी ब्लॅकमेल करण्याचे समाजात पेव फुटले आहे. यामुळे फसवणूक झालेले काही तरुण -तरुणी भीतीपोटी एक तर पैश्याची मागणी पूर्ण करतात. किंवा आत्महत्या करतात. अशा वेळी सोशल मीडियाद्वारे ब्लॅकमेनिंग होत असेल, तर आपल्या वरिष्ठांना किंवा मित्रांना सांगावे असा संदेश सोशल मीडिया मार्फत वकील प्रदीप बावस्कर यांनी दिला.