ठाणे : देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ साहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला सोमवारी रात्री भिवंडी येथून ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात (PFI officer arrested from Kalyan Bhiwandi) घेतले. आशिक शेख (रा. आमपाडा, भिवंडी) असे ताब्यात घेतलेल्या पीएफआय पदाधिकाऱ्याचे नाव (PFI officer Kalyan Bhiwandi) आहे.
आतापर्यंत भिवंडीतून दोघांना अटक - दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणारी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) आज पुन्हा छापे (NIA Raid) टाकले. दिल्ली, उत्तर प्रदेशसह आठ राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. ‘पीएफआय’चे १००हून अधिक सदस्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत भिवंडी येथील एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. सोमवारी रात्री आशिक शेख याला अटक करण्यात आली. आतापर्यंत भिवंडीतून दोघांना अटक करण्यात आली (PFI Officer Arrested) आहे. याआधी 22 सप्टेंबर रोजी बंगालपूरा परिसरातून मोईनुद्दीन मोमीन याला अटक करण्यात आली आहे.