ETV Bharat / city

Physical abuse : चुलत बहिणीवर केला अत्याचार, भिवंडी परिसरातून एकास अटक

पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून भिवंडी तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक केली.

thane rape case
thane rape case
author img

By

Published : Sep 29, 2021, 7:01 PM IST

ठाणे - बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय चुलत भावाने १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी अत्याचारी चुलत भावाला आज सकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे.

अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म

भिवंडी तालुका ग्रामीण भागातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तिच्या घरातच आरोपी चुलत भाऊ राहतो. काही महिन्यापूर्वीपासून तो पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता. त्यातच आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नव्हती. पंरतु पीडित अल्पवयीन मुलीने २६ सप्टेंबर रोजी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

गुन्हा दाखल

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून भिवंडी तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.