ठाणे - राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक हे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कार्यालयात दाखल झाले आहे. 22 मार्चच्या मध्य रात्री दमणवरून MH056789 वोल्वो गाडी ठाणे एटीएसने ताब्यात घेतली होती. तिचा शोध एनआयएदेखील घेत होती. अभिषेक नाथानी (अगरवाल ) हा त्या गाडीचा मालक आहे. या गाडीचा ताबा एनआयए घेणार आहे.
मनसुख प्रकरणात वाझे यांनी ज्या गाड्यांचा वापर केला. त्या सीसीटीव्ही फुटेजमार्फत तपासातून समोर आल्या आहेत. वोल्वो गाडीचा वापर कशासाठी झाला, याचा शोध एनआयए घेणार आहे. याच गाडीमधून फॉरेन्सिक लॅबच्या टीमने काही वस्तू काढून तपासासाठी नेल्या होत्या.