ठाणे - वाढलेल्या सिलिंडरच्या किंमतींविरोधात राष्ट्रवादीने ठाण्यात आंदोलन केले. 'चुल्हा जलाओ, मोदी भगाओ' अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी भाजत या निर्णयाचा निषेध केला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्यावतीने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकऱया भाजल्या. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे 144.5 आणि 145 रुपये प्रति सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोरच अनोखे आंदोलन करत जोरदार निषेध केला. ‘बहुत हुई महंगाई की वार, चले जाओ मोदी सरकार’, 'मोदी सरकार हाय-हाय', 'चुल्हा जलाओ मोदी भगाओ', अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी चुल पेटवून भाकर्या भाजल्या.
हेही वाचा -