ठाणे - भाजपाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. भाजपाने 2014 साली दिलेली आश्वान पाळली नाहीत. लोकांना घरं देवू म्हणत अजूनही नागरिकांना पक्क घरं मिळाले नाही. अच्छे दिन म्हणत भाजपाने आणि केंद्र सरकारने Sharad Pawar Criticized BJP एकही गोष्ट पूर्ण केली नाही. अच्छे दिन पाहायलाच मिळाले नाही, लोकांना फोडून सरकार स्थापन करण्याचे काम भाजपाने केले, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांनी भाजपावर केली आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाच्या बैठका घेऊन पक्ष वाढीसाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आले होते, त्यांनी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांचा पुढे काय झालं याचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी मोरारजी देसाई यांनी 82 व्या वर्षी मंत्रिपद मिळवले होते त्याचा कित्ता गिरवणार नाही असे सूचक वक्तव्य केले आहे.
अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांवर 110 वेळा धाडी टाकण्यात आल्या आहेत. देशातील हा एक रेकॉर्ड झाला आहे आतापर्यंत एवढ्या धाडी मी पहिल्या नाहीत. 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत हे सत्र सुरू केले आणि आता हा घोटाळा 1 कोटींचा आहे असे चार्जशीटमध्ये सांगतात. हे विरोधकांना अडचणीत आणण्याचा घाट सीबीआय, ईडी आणि इन्कम टेक्सच्या माध्यमातून सुरू आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. देशातील अनेक राज्यात भाजप सत्ता मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचा आरोप ही त्यांनी ठाण्यात केला.
राज्यात झालेल्या सत्तातरांनंतर आरोप - प्रत्यारोप पाहायला मिळत असून, बंडखोरांचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी पहिल्यांदा ठाण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आढावा पवार यांनी घेतला. पक्षाच्या कामासाठी ही बैठक घेण्यात आली होती, आमच्या पक्षातील नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जावे आणि सर्वांनी आढावा घ्यावा असे ठरले असून त्याची सुरुवात ठाण्यापासून केली असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याने पुढील निवडणुकीच्या तयारी करण्यात येत आहे.
माझी ठाण्याची आठवण - माझ्या लक्षात गोष्ट आली, मी ठाण्याला जवळून बघत आलो आहे, ठाणे म्हटल्यानंतर मी लहानापासून, माझ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवेशापासून मी ठाण्याला फार जवळून बघत आलो आहे, ठाण्याचे एक वैशिष्ट्य असे होते, अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व ठाण्याने दिले, खंडू रांगणेकर, विमल ताई, प्रभाकर हेडगे, यडगावचे पाटील यासारखे अनेक नेते विशिष्ट समाजकारण, राजकरण करणारे ठाणे हे आमच्या निदर्शनास होते, मात्र हळूहळू पुन्हा अशीं स्थिती निर्माण होईल यासाठी ठाणेकरांनी काळजी घेतली तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असे पवार म्हणाले.