ठाणे - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी कसून प्रचार केला आहे. आता, सर्व पक्षांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता निकाल लागेपर्यंत नेतेमंडळी काय करणार, जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या रिपोर्टमधून...
प्रचार संपल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता निकाल लागेपर्यंत त्यांना वेळ मिळाला आहे. २-३ महिने रात्र-दिवस काम केल्यानंतर नेते मंडळी निवांत झाली आहेत. राष्ट्रवादीचे नेतेही सध्या निवांत झाले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी कशी करायची यावर आता नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.