ETV Bharat / city

मनसेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची माघार; मुंब्र्यातही एमआयएमच्या उमेदवाराचे घुमजाव - राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांनी उमेदवारी मागे घेण्यामागे मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारी मागे घेण्यामागे मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू आहे.
author img

By

Published : Oct 8, 2019, 1:34 PM IST

ठाणे - उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांनी उमेदवारी मागे घेण्यामागे मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू आहे.

त्यामुळे आता ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात दुहेरी लढत दिसणार आहे. तर दुसरीकडे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार बरकत उल्लाह अली हसन शेख उर्फ गुंजन शेख यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने एमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

तसेच कळवा-मुंब्रा मतदारसंघात सेनेचे उमेदवार दिपाली सय्यद आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये लढत असणार आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व ओवळा-माजिवडा मतदारसंघात कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने याठिकाणी मते फुटण्याचा धोका वाढला आहे.

Intro:ठाण्यात राष्ट्रवादी च्या उमेदवाराची मनसेच्या उमेदवारासाठी माघार
मुंब्रा मधे एमआईएम च्या उमेदवाराची माघारBody:उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे . देसाई यांची उमेदवारी मागे घेण्यामध्ये मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदार संघात सुरु झाली आहे . त्यामुळे आता ठाणे शहर विधान सभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात दुहेरी लढत दिसणार आहे . तर दुसरीकडे कळवा -मुंब्रा विधानसभा मतदार संघात एमआयएमचे उमेदवार बरकतउल्लाह अली हसन शेख उर्फ गुंजन शेख यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली असल्याने एमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे . मुस्लिम बहुल मतदार संघ असल्याने या ठिकाणी एमआयएमचा मतदार वर्ग देखील असल्याने आता एमआयएमच्या उमेदवाराने अचानक उमेदवारी मागे घेतली असल्याने राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना आता ही निवडणूक आणखी सोपी जाणार आहे . तर या कालवा मुंब्रा विधान सभा क्षेत्रात सेनेचे उमेदवार दीपाली सय्यद आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची लढत दिसून येणार आहे . तसेच  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी तर ओवळा माजिवडा मतदार संघात मात्र कोणत्याही उमेदवारीने उमेदवारी अर्ज मागे घेतली नाही .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.