नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता आय.सी.एम.आर. व महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार काही खाजगी दवाखान्यांना उपचाराखातर नवी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली होती. असे असताना नवी मुंबईत काही खाजगी दवाखान्यांनी विनापरवानगी कोविड रुग्णांवर उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला होता. याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रारी येतात त्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून दोन दिवसापूर्वी वाशीतील पाम बिच रुग्णालय व कारवाई केल्यानंतर आता ग्लोबल फाईव्ह केअर रुग्णालय वाशी व क्रीटी केयर रुग्णालय ऐरोली या आणखी दोन रुग्णालयांवर कारवाई केली आहे.
कोरोना काळात नवी मुंबई महानगर पालिकेची कोणतीही परवानगी नसताना काही खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून रुग्णांची आर्थिक लूट करत त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार केला जात आहे. वाशी सेक्टर २८ मधील पाम बीच हॉस्पिटल, ऐरोली स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स, सेक्टर १६ येथील नावाजलेल्या क्रिटी केअर रुग्णालय व वाशी सेक्टर ९मधील ग्लोबल फाईव्ह केअर हॉस्पिटल यांना नवी मुंबई महानगर पालिकेची कोविड उपचाराखातर कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. हा प्रकार नवी मुंबईतील काही समाजसेवकांनी तक्रार करुन पालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिला होता. आधी पामबीच रुग्णालय वाशी या दवाखान्यावर कारवाई केल्यानंतर आता ऐरोलीतील क्रीटी केअर रुग्णालय व वाशीतील ग्लोबल फाईव्ह केअर (कुन्नुरे ) या रुग्णालयांवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई करत या रुग्णालयांना नोटीस पाठवल्या आहेत. तसेच पालिकेचा पुढील आदेश येईपर्यंत ही रुग्णालये बंद करण्यात येणार आहेत. तसेच यांना पालिकेने एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
हेही वाचा - बाळाला दात येताना...