ETV Bharat / city

नवी मुंबईत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यावर भर - मनपा आयुक्त - navi mumbai corona updates

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधासाठी, नवनियुक्त आयुक्तांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या उपाययोजनांची प्रत्यक्षात योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर हे अचानकपणे भेट देत आहेत. तसेच नवी मुंबईत कोरोनाची साखळी तोडण्यावर भर देण्यात येत आहे.

navi mumbai municipal commissioner abhijit bangar
नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर
author img

By

Published : Jul 27, 2020, 1:09 AM IST

नवी मुंबई - महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे सद्यस्थितीत 13 हजार 618 कोरोना बाधीतांचा आकडा नवी मुंबई शहरात झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी, नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या उपाययोजनांची प्रत्यक्षात योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर हे अचानक जाऊन भेट देत आहेत. रविवारी आयुक्तांनी विभागीय कार्यालयात जाऊन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.

नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - VIDEO : कोल्हापुरातील कोविड केअर सेंटर मध्ये पार पडली चक्क फुटबॉल मॅच!

विशेष म्हणजे या अनुषंगाने आयुक्तांनी प्रभाग स्तरावर आढावा बैठक घ्यायलाही सुरुवात केली आहे. मिशन ब्रेक द चेन या अनुषंगाने अर्ध्या तासात त्वरित तपासणी अहवाल हातात येणाऱ्या रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना त्या क्षेत्रातील प्रवेश प्रतिबंध व निर्जंतुकीकरण त्वरित करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावे, त्याचप्रमाणे एका परिसरात जवळजवळच्या घरांमध्ये 5 रूग्ण आढळल्यास 100 मीटर परिसराच्या क्षेत्रात नागरिकांनी ये-जा करू नये, याची काळजी घ्यावी, यासाठी रस्त्यांवर लावण्यात येणारे बॅरिकेटिंग 8 फूटांपेक्षा उंच असावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्राकडे पोलीस विभागाने अधिक लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कसा होईल, याचीही काळजी घेत तशा प्रकारच्या सोयी विभाग कार्यालयांनी त्या-त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घ्यावे, असे आयुक्तांनी सांगितले आहे. ज्या भागामध्ये अधिक प्रमाणात करोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, अशीच 42 क्षेत्रे तिसऱ्या श्रेणीत विशेष प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच तेथील नागरिक कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने घरातच कसे राहतील, याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.