ETV Bharat / city

ठाण्यात कोरोना रुग्णांच्या हातावर मारणार शिक्के, लसिकरणाची गती वाढवणार

कोरोनाची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सज्ज रहावे, अशा सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

second wave of corona in Thane
second wave of corona in Thane
author img

By

Published : Mar 31, 2021, 7:20 PM IST

Updated : Mar 31, 2021, 7:36 PM IST

ठाणे - कोविड 19 ची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सज्ज रहावे, अशा सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत दिल्या. त्याचबरोबर ठाणे ग्लोबल कोविड हॅास्पीटल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालय येथे तातडीने सीटीस्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. कोविडच्या इतर रुग्णांबरोबरच कोविडची लागण झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सहव्याधी रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णांच्या हातावर शिक्के मारा -

दरम्यान, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेवून अशा रुग्णांच्या हातावर शिक्का मारुन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि जास्तीत जास्त संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होतील, या दृष्टीने महापालिकेने कटाक्षाने कार्यवाही करावी अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे
मागील महिन्याभराच्या काळामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठकीचे आयोजन केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस खासदार राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरूडकर, आरोग्य अधिकारी अनिरुध्द माळगावकर, डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.
चिंताजनक बाब -
मागील वर्षी पेक्षा यावेळेस कोरोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करीत सर्व प्रशासन यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी देखील सक्षमपणे काम करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याकामी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर सर्व ताकदीनिशी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. या सेंटर आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधसाठा, रेमडेसिवीर व आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचित केले.
हे ही वाचा - धावत्या बसच्या खिडकीतून मुलीने डोके काढले बाहेर, ट्रकच्या धडकेत झाले धडावेगळे

लसीकरण केंद्रे वाढवण्याच्या सूचना -

याचबरोबर लसीकरण केंद्रे वाढवून जास्तीत जास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी मनुष्यबळाची संख्या वाढवावी. तसेच होम कॉरंटाईन केलेल्या रुग्णांवर शिक्के मारुन तो रुग्ण घराबाहेर पडणार नाही, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करण्यात यावी यासाठी तज्ज्ञ डॉक्टर सज्ज करण्यात यावेत. यापूर्वी कार्यान्वित केलेले विलगीकरण कक्ष सज्ज करुन या ठिकाणी दैनंदिन साफसफाई, आवश्यक औषधपुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स, भोजनाची व्यवस्था होईल या दृष्टीने प्रशासनाने काम करावे. तसेच ज्या विभागात रुग्ण सापडत आहेत, तेथील नागरिकांमध्ये जनजागृती होणेसाठी होर्डिंग्ज लावणे, कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील होर्डिंग्जवर कोविड वॉर रुमचे दूरध्वनी क्रमांक देवून संपर्क साधण्याचे आवाहन करावे. ठाणे महापालिकेचा कोविड वॉर रुम हा अद्ययावत असून रुग्णांना संपर्क साधल्यास तात्काळ सेवा पुरविली जाते. परंतु रुग्णांनी या वॉर रुमपर्यत पोहचणे आवश्यक असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

अत्यंत चांगल्या प्रकारे ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहीम चालू असून लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, प्रभागनिहाय सर्वच लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे काम करीत असून यापुढे देखील समन्वयाने काम करावे असे देखील महापौर म्हणाले.

हे ही वाचा - काश्मीरच्या ऐतिहासिक सूर्यमंदिराची शोकांतिका..
पालकमंत्र्यांच्या सूचना -

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सर्व विभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्यप्रकारे करणे, आवश्यकतेनुसार औषध फवारणी करणे तसेच जे नागरिक मास्क वापरत नाहीत, त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणे तसेच रात्री 8 नंतर लागू संचारबंदीचे पालन होते आहे की नाही, यासाठी गस्त वाढविणे, आवश्यकतेनुसार मार्शलची नियुक्ती करण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या.

कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करता यावे रुग्ण्वाहिकांची संख्या वाढविणे, आवश्यकतेनुसार परिवहनच्या बसेसचे रुग्णवाहिकेत परिवर्तित करणे, तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची सीटी स्कॅन करण्यासाठी ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा येथे सीटी स्कॅनची मशीन उपलब्ध करणे, जेणेकरुन रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही व रुग्णांवर योग्य उपचार करणे सोईचे होईल या दृष्टीने कार्यवाही करावी आदी सूचना देत असतानाच या सूचनांची अंमलबजावणी देखील तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Last Updated : Mar 31, 2021, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.