ETV Bharat / city

ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार; पालिका आयुक्तांनी घरोघरी जाऊन केली पाहणी - ठाणे कोरोना पेशंट

ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांशी आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन संवाद साधत आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाचा सामान्यांकडून काय अपेक्षा आहेत, हेदेखील सांगत आहेत. सोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या असतील हे देखील समजावून सांगत आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रशासन म्हणून त्यांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, याबद्दल माहिती घेत आहेत.

municipal-commissioner-of-thane-visited-various-parts-of-city-amid-corona-spread
ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार; पालिका आयुक्तांनी घरोघरी जाऊन केली पाहणी
author img

By

Published : Jun 30, 2020, 7:06 PM IST

ठाणे - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाययोजना करून बाधितांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, संक्रमण रोखण्यासाठी सर्व्हे करणे, रुग्ण आढळलेला परिसर निर्जंतुकीकरण करणे हा लॉकडाऊनचा मुख्य उद्देश असल्याचे ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले. लोकांना लॉकडाऊनच्या नावावर घराबाहेर न पडू देणे चुकीचे असल्याचेही शर्मा म्हणाले.

ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांशी आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन संवाद साधत आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये प्रशासनाचा सामान्यांकडून काय अपेक्षा आहेत, हेदेखील सांगत आहेत. सोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या असतील हे देखील समजावून सांगत आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये प्रशासन म्हणून त्यांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, याबद्दल माहिती घेत आहेत.

२ ते ११ जुलैदरम्यान लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊन काळात कोरोनाची साखळी तोडून बाधितांची संख्या कमी करणे, हा प्रशासनाचा उद्देश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. तो ताण कमी करण्यासाठी रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे, असे शर्मा यांनी सांगितले. शहरातील किसन नगर, भडवाडी, शिवटेकडी या भागात आयुक्तांनी दौरा केला. तसेच कळवा येथील क्वारंटाईन सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी नागरिक, कर्मचारी आणि डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला.

ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार; पालिका आयुक्तांनी घरोघरी जाऊन केली पाहणी

पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी किसननगर शाळा क्रमांक 23 येथील फिव्हर क्लिनिकची पाहणी केली. त्याचप्रमाणे तेथील सार्वजनिक शौचालयाचीही पाहणी करून रोज चार ते पाचवेळा शौचालयाची साफसफाई होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी डॅा. शर्मा यांनी भटवाडी नाल्याची पाहणी करून त्या नाल्यातील गाळ तातडीने बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.

महापालिका आयुक्त यांनी कळवा प्रभाग समितीतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या सहकारनगर येथील क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. यावेळी या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत, याची माहिती परिमंडळ उप आयुक्त मनीष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.