ठाणे : भारताचे पंतप्रधान यांचा महत्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प आता रखडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत (Metro 4 Project Delay) आहे. ठाणे आणि मुंबई मेगासिटीला जोडणारे मेट्रोचे जाळे विस्तारित करण्याचा आणि तासंतास प्रवासाऐवजी अल्पावधीतच मुंबई आणि ठाण्यात कुठेही पोचविणारे मेट्रोचे जम्बो जाळे याला कंत्राटदाराचे ग्रहण लागल्याचे चित्र (Metro Project Costs increased due to contractors) आहे. या ग्रहणामुळे ठेकेदारांचे चांगभले तर जनतेच्या पैशाचा चुराडा झाला. शिवाय मुदतवाढ मिळाल्याचे चित्र आहे. २०२२ मध्ये मेट्रो सुरु होण्याची शक्यता सध्या तूर्तास लांबली असून आता २०२६ पर्यंत ठाण्यात मेट्रो धावण्याची शक्यता (Metro 4 Project Delay due to contractors) आहे.
मेट्रो ४ प्रकल्प - हा महत्वाकांक्षी आणि ठाण्यात मेट्रोचे जाळे पसरणार ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार असल्याने मेट्रो ४ च्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. राज्य सरकारने २७ सप्टेंबर २०१६ मध्ये मेट्रो-४ च्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याच्यासाठी १४ हजार ५४९ कोटींचा निधी निर्धारित करण्यात आला. २५ ऑक्टोबर २०१६ ला शासनाचा निर्णय निघाला. मेट्रो-४ च्या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २८३ कोटी २१ लाखाचा निधी देण्यात आला. अन मेट्रोच्या कामासाठी ५४ महिन्याचा निर्धारित कालावधीही देण्यात आला. त्यानंतर मेट्रोच्या जाळ्याचा फेरविचार झाला आणि मेट्रोचे जाळे गायमुख पर्यंत विस्तारित करण्यात (Metro 4 Project Costs increased) आला.
प्रकल्प रखडल्याने आर्थिक नुकसान - मेट्रो-४ च्या कामासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २८३ कोटी २१ लाख रुपये दिल्या नंतर २०२२ मध्ये काम पूर्ण करण्याची डेड लाईन होती. मात्र कोविडच्या महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. त्यात एका ठेकेदाराने काम खुप संथ गतीने केले. यामुळे मेट्रोच्या कामाचे नियोजन बिघडले. कामे रखडल्याने मेट्रोच्या किमतीत वाढ झालीच, त्याशिवाय मेट्रोच्या सल्लागार कंपनीच्या खर्चातही वाढ झाली. ती ३३.९४ टक्के म्हणजेच २८३ कोटी २१ लाखावरून ३७९ कोटी ३२ लाखावर पोहचली. मुदतीच्या बाबतीत २०१६ मध्येच ५४ महिन्याची मुदत हि संपुष्टात आल्यानंतर अतिरिक्त मुदत वाढीत पुन्हा ३३ महिन्याने वाढल्याने मेट्रो-४ ला प्रलंबितचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता २०२२ ची मेट्रो-४ ही २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान मेट्रो-४ चे काम हे विहित कालावधीत पूर्ण होईल कि नाही, असे प्रश्नचिन्हच निर्माण होत आहे. एकीकडे वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली-गायमुख मेट्रो चार आणि मेट्रो चार-अ या प्रकल्पांसाठी राज्य शासन दुय्यम कर्जाच्या रूपाने आर्थिक उभारणी करत आहे. तर दुसरीकडे मात्र रखडपट्टीमुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होत असल्याचे चित्र (Metro 4 Project)आहे.
कामाच्या प्रगतीचा टक्का घसरला - तब्बल ३५.३८ किमीच्या विस्तारित मेट्रो हि वडाळा येथून मेट्रो-४ च्या प्रकल्पाची सुरुवात असून मेट्रो मार्गिका ही अमर महल चेंबूर-घाटकोपर-विक्रोळी-मुलुंड-ठाणे-कासरवडवली आणि त्यापुढे गायमुखपर्यंत विस्तारित आहे. या ३५ किमीच्या मट्रो परिसरात मेट्रोची तब्बल ३२ एवढी स्टेशन निर्धारित करण्यात आलेली आहेत. मेट्रो-४ च्या सल्लागार कंपनीच्या अंगावरच मेट्रो-४ अ ची जबाबदारी टाकण्यात आल्याने यासाठी कंपनीला २० कोटीची रक्कम जरी दिली. तरीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा तणाव वाढला. त्यामुळे मेट्रो-४ च्या विकास कामाचा टक्का घसरला आणि तो जेमतेम ३८ टक्क्यांवर आला असल्याचा दावा एमएमआरडीएने केला. मात्र महामारीच्या दोन वर्षाने मेट्रोच्या विकास गतीला खीळ बसली.
मुदतीत आणि निधीत वाढ - कामे सुरु असली तरीही निर्णयापर्यंत पोहचलेली नाहीत. आता महामारीनंतर पुन्हा मेट्रोच्या कामांना गती मिळत आहेत. मात्र अनेक अडचणी समोर जैसे थे आहेत. यामध्ये भूसंपादनाचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचा प्रश्न, कामाच्या गटासाठी ठेकेदार अपयशी आल्याने नव्याने उप ठेकेदार नियुक्ती, सर्वसामान्यांना माणसाकडून न्यायालयात प्रलंबित दावे, अशा पद्धतीच्या विविध समस्या यामुळे मेट्रो-४ च्या विकासाची गतीला खीळ बसली. ही खीळ अद्यापही १०० टक्के दूर झालेले दिसत नाही. त्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख करीत मुदतीत आणि निधीत वाढ केलेली मेट्रो-४ ही २०२६ मध्ये तरीही धावणार काय ? हे प्रश्नचिन्ह आजही कायम आहे.
घोषणा नको प्रकल्प पूर्ण करा - राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणुका लक्षात ठेवून नवीन नवीन घोषणा करतात. मात्र आधीचे सुरू असलेले प्रकल्प रखडले, तरी त्याकडे लक्ष देत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे पैसे खर्च होतात. मात्र त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नाही, असा टोला ही मनसे नेते राजू पाटील यांनी सरकारला लगावला आहे.