ठाणे - ठाण्यात वाचन संकृती वाढवावी म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आज लोप पावत असलेल्या वाचनसंस्कृतीला पुनर्जीवित करण्यासाठी वाचन चळवळ जीवित ठेवणे आवश्यक आहे. नेमका हाच धागा पकडून माजी राष्ट्रपती ए पी अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून एक विशेष उपक्रम राबवण्यात आला.
ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने मोठ्या शिशुच्या विद्यार्थयांची बाराखडी, शब्द आणि छोट्या वाक्यांचे वाचन घेण्यात आले. यावेळी मुलांनी देखील हसत-खेळत वातावरणात शब्दांचे वाचन केले. बाराखडीच्या वाचनामुळे मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट होत असतात ,असे पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांनी सांगितले.
ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात चिटणीस केदार जोशी यांच्या सहकार्याने हा वाचन महोत्सव साजरा करण्यात येतो.