ठाणे - शहरात राहणाऱ्या एका घटस्फोटीत महिलेने आपल्या ३ वर्षाच्या मुलाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ तिने स्वःतह बनवून नवऱ्याला पाठवला. ही घटना ठाण्याच्या मुंब्रा परिसरात घडली.
नवऱ्याबरोबर घटस्फोट झाल्याने तिने हे कृत्य केल्याचे समजते. मुलाला मारहाण करण्याचे कारण पतीला घाबरवणे असे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
पती पत्नीच्या भांडणात लहानग्या मुलाला मारहाण केल्याने, सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मारहाणीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.