ETV Bharat / city

आदिवासी वस्तीपांड्यांना बेघर करणाऱ्या वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयावर मोर्चा - bhivandi march news

अन्यायकारक नोटीस बजाविल्याने या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी वनक्षेत्रपाल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भिवंडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

आदिवासी मोर्चा
आदिवासी मोर्चा
author img

By

Published : Feb 23, 2021, 7:40 PM IST

Updated : Feb 23, 2021, 7:47 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील ३३ गावांमध्ये वनखात्याच्या जमिनींवरील आदिवासी कुटुंबीयांच्या तब्बल तीन हजार घरांना वनविभागाने घरे मोकळी करून जागा वनखात्याच्या ताब्यात द्यावी अन्यथा कारवाई केली जाईल अशी अन्यायकारक नोटीस बजाविल्याने या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी वनक्षेत्रपाल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भिवंडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

मोर्चेकरांच्या विविध मागण्यांसह वन अधिकाऱ्यांना इशारा

आदिवासी कुटुंबीयांना दिलेली नोटीस तत्काळ मागे घ्या, आदिवासी कुटुंबीयांना बेघर करून त्यांना भयभीत करणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात अ‌ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करा, आदिवासींच्या रहिवासी असल्याबाबतचे पुरावे वनविभागाने गोळा करावेत, अशा मागण्या घेऊन बस स्थानकातून सुरू झालेल्या या मोर्चाचे वनपरीक्षेत्र कार्यालयात सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, सुनील लोणे, प्रमोद पवार, दशरथ भालके, संगीत भोमटे, जया पारधी, आशा भोईर, सागर देसक, मोतीराम नामखुडा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सभेत अनेकांनी मार्गदर्शन करताना वनविभागाच्या अरेरावी कार्यपद्धतीचा पाढा वाचून यापुढे ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.

'बेघर होऊन मरण्यापेक्षा मरण पत्करू'

शासन एकीकडे जमीन घरे असलेल्यांच्या नावे करण्याबाबत आदेश काढत असताना वनविभाग आदिवासी, कष्टकरी समाजाला बेघर करण्याचा घाट घालीत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला. शेकडो आदिवासी स्त्री-पुरुषांनी भिवंडी वनपरीक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून या नोटिशीबाबत जाब विचारला. स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्याने मोर्चाला परवानगी नाकारली असताना बेघर होऊन मरण्यापेक्षा मोर्चा काढून, पोलिसांच्या लाठ्या खाऊन मरण पत्करू, अशी भूमिका घेत हा मोर्चा काढला असल्याची प्रतिक्रिया सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.

बेकायदेशीर मोर्चा काढल्याप्रकरणी नोटीस

उपविभागीय वनअधिकरी श्रीमती देसाई, भिवंडी वनपरीक्षेत्र अधिकरी संदीप आरदेकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली व सर्व नोटीस प्रकरणांची शहानिशा करून कोणाही आदिवासी कुटुंबीयांना बेघर होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली. तर शांतीनगर पोलिसांनी या मोर्चास परवानगी दिली नसतानाही बेकायदेशीर मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजक भिवंडी शहर पदाधिकारी सागर देसक, मोतीराम नामखुडा यांना १४९प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

Last Updated : Feb 23, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.