ETV Bharat / city

'उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री "योगी" बोलण्याच्या लायकीचे नाहीत'

मोहन कंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट करून मी सध्या उत्तर प्रदेशातून उल्हासनगर येथे येण्यासाठी निघालो असून उद्या दुपारपर्यंत मी पोहोचणार आहे. त्यानंतरही मी प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोहन कंडारे
मोहन कंडारे
author img

By

Published : Oct 11, 2020, 10:49 PM IST

ठाणे - उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून भाजपच्या उल्हासनगर शहराध्यक्षाने व्यथित होऊन राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी जिल्हाध्यक्षाला लिहिलेल्या राजीनामा पत्रातून उत्तर प्रदेशमधील हाथरस मधील घडलेल्या घटनेतून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना हा मुख्यमंत्री 'योगी' बोलण्याच्या लायकीचा नसल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

मोहन कंडारे यांची प्रतिक्रिया

मोहन रामसिंग कंडारे असे त्यांचे नाव असून त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कुमार आयलानी यांना पत्राद्वारे राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे या पत्रात त्यांनी जिल्हाध्यक्षाला ही राजीनाम्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मोहन कंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट करून मी सध्या उत्तर प्रदेशमधून उल्हासनगर येथे येण्यासाठी निघालो असून उद्या दुपारपर्यंत मी पोहोचणार आहे. त्यानंतरही मी प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - 'मंदिरे सुरू करा म्हणायला तुम्हाला काय? जबाबदारी आमच्यावर आहे...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.