ETV Bharat / city

सरकारचे नियोजन नसल्यानेच आपत्ती काळात जीवितहानी, तर आणखी दुर्घटना होऊ शकतात - राज ठाकरे - कोकणात नियोनजाच्या अभावाने दुर्घटना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि जीवितहानीवर आपले मत व्यक्त करताना, सरकारच्या दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे या घटना घडत असल्याचे मत व्यक्त केले आहे. यापुढेही अशाच घटना घडत राहतील, अशी भिती ही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सरकारचे नियोजन नसल्यानेच आपत्ती - राज ठाकरे

author img

By

Published : Jul 28, 2021, 9:16 AM IST

Updated : Jul 28, 2021, 9:59 AM IST

ठाणे - राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने हाहाकारा माजवला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराचे पाणी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 250 जास्त नागरिकांचे बळी गेले. या घटनांनंतर राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झाले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनांबाबत बोलताना, अतिवृष्टी, दरडी कोसळून जीवितहानी होत आहे, हे नुकसान होण्याचे एकमेव कारण म्हणजे कोणत्याही गोष्टीचे नियोजन नाही. टाऊन प्लॅनिंग नाही, कुठल्याच सरकारला शहरांच्या नियोजनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप केला आहे. तसेच या नियोजन शून्यतेमुळे पुन्हा पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार, अशी भीती देखील ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मनसे कार्यकर्त्यांशी
मनसे कार्यकर्त्यांशी "राजसंवाद"

आगामी मनपा निवडणुका व संघटना बांधणीसाठी मंगळवारी राज ठाकरे ठाण्यातील मनसैनिकांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाणे शहर मनसे पदाधिऱ्यांयांसोबत जनसंवाद बैठक घेतली. यावेळी आगामी काळात पक्षात काही गंभीर निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष पासून प्रभाग अध्यक्षपर्यंतच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. बाकीच्या इतर कार्यकर्त्यांना बैठकीत सहभागी करण्यात आले नव्हते. मोजक्याच 100 पदाधिकाऱ्यांना या बैठकीत सहभागी करण्यात आले होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

तर आणखी दुर्घटना होऊ शकतात - राज ठाकरे

कोकणात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवेल-

यावेळी कोकण व इतरत्र अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती बोलताना राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक जण आपआपल्यापरीने मदतीचे कार्य करत आहे. ठाणे पूर्वी टुमदार शहर होते. परंतु आता त्या शहराची वाट लागली आहे. शहरांचे योग्य नियोजन नसल्याने, टाऊन प्लॉनिंग नसल्याने अशी परिस्थिती ओढवत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. दोन वर्षापूर्वीही कोकणात असे घडले होते. परंतु, कुठल्याच सरकारला या नियोजनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे भविष्यातही अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याची भीती राज यांनी यावेळी व्यक्त केली.

नव्याने नवनिर्माणाचा कानमंत्र

पक्षाच्या जनसंवाद बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा वापर कमी करा, असा नवनिर्माणाचा नवा कानमंत्र दिला आहे. याबरोबरच प्रभाग अध्यक्ष पद रद्द करणार असून याऐवजी पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात दुसरा पर्याय निवडणार असल्याचे राज यांनी पक्षातील बदलांसदर्भात स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात येणार असल्याचेही कार्यकर्त्यांना सांगितले.

पुरणपोळीची शिदोरी घेतली सोबत -
पुरणपोळीची शिदोरी घेतली सोबत -

राज यांनी घेतला मोदकांचा आस्वाद, पुरणपोळीची शिदोरी घेतली सोबत -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठमोळ्या पदार्थांचे खवय्ये असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. ठाण्यात आल्यानंतर राज यांनी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने उकडीचे मोदक आणि पुरणपोळीचा मनोसक्त आस्वाद ही घेतला. एवढेच नव्हे तर महिला मनसैनिकांनी दिलेली मोदक आणि पुरणपोळीची शिदोरी राज आपल्या सोबत घेऊन गेले आहेत. स्वतः राज यांनी ही शिदोरी आपल्या वाहनांमध्ये ठेवण्यास सांगितले.

पक्ष पदाधिकाऱ्याची बैठक पार पडल्यानंतर कळवा विभागातील महिला सचिव वैभवी मुरूमकर यांनी बनवून आणलेले मोदक आणि पुरणपोळीचा राज ठाकरे यांनी आस्वाद घेतला, तसेच यावेळी वांग्याची भाजी, मिरची भजी, ठेचा, धिरडे असे भोजनही राज यांनी यावेळी केले. यापूर्वी अनेकदा ठाण्यात आल्यानंतर राज ठाकरेंनी मामलेदार मिसळवर ताव मारलेला आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे मंगळवारी राज यांनी मोदक कृष्णकुंजवर तर ठाण्यातून पुणे दौऱ्यासाठी पुरणपोळ्या आपल्या सोबत घेतल्या आहेत.

Last Updated : Jul 28, 2021, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.