ठाणे: काही माणसे झटपट पैसे कमविण्याच्या नादात विविध गोरखधंदे शोधून त्यातून पैसे मिळवितो. foreign liquor असाच एका गोरखधंद्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या मोठ्या बाटल्यामधून दारू काढून ती इतर ठिकाणी विक्री करत असल्याचा कयास नेटकऱ्यांकडून लावला जात आहे.
विदेशी दारू काढून त्या ऐवजी तेवढेच पाणी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी साठवणूक करणारे दारूची गोदामे आहेत. या गोदामातून दिवसागणिक बहुतांश टेम्पोमधून जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बार अँड रेस्टारेंटमध्ये विदेशी दारूची वाहतूक केली जाते. मात्र गोदामातुन वाहतूक करणारी गाडी निघताच, अंधाराचा फायदा घेत, टेम्पोमध्ये विदेशी दारूच्या पॅक बाटलीचे झाकण चलाखीने उघडून त्यामधून काही विदेशी दारू काढून, त्याऐवजी तेवढेच पाणी टाकून बाटली पुन्हा सीलबंद करण्यात येत असल्याचे व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे. हा व्हायरल व्हिडिओ भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्यातील असून गेल्या ५ ते ६ दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोरखधंद्याला आळा घालणार का ? दरम्यान विदेशी दारूच्या बाटलीत पाणी टाकून त्या बाटलीतील दारूच्या विक्रीचा गोरख धंदा विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची चर्चा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे अश्या गोरखधंद्याला दारू उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन आळा घालणार का ? असा प्रश्न या व्हायरल व्हिडिओमुळे उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे ज्या विदेशी दारूला मद्यपीकडून अधिक मागणी आहे. त्यामध्ये मॅकडोल, रॉयलचॅलेंज, ब्लेंडरस्प्राईट अश्या विदेशी दारूच्या बाटलीतुन दारू काढून त्यामध्ये पाणी टाकले जात असल्याचे व्हायरल व्हिडीओ दिसून येत आहे.