ETV Bharat / city

वयाचे बनावट कागदपत्रे बनवून गुजरातमध्ये लावून दिला अल्पवयीन मुलीचा विवाह; आई व मामावर गुन्हा दाखल

१५ वर्षाच्याम मुलीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. मात्र, तिची आई व मामामुळे तिचे स्वप्न भंग झाले. गुजरातमध्ये तिचा विवाह लावून ( Minor girl marriage in Gujarat ) दिला होता. मात्र, तिने कशीबशी सुटका केली.

बालविवाह
बालविवाह
author img

By

Published : Jul 10, 2022, 10:13 AM IST

ठाणे - एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बनावट आधारकार्ड ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंतचा १८ वर्षे वयाचा ( fake Aadhaar card ) पुरावा तयार करण्यात आला. तिचा विवाह गुजरातमधील २५ वर्षीय तरुणासोबत केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हिललाईन पोलीस ( Hilline Police ) ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिची आई व मामावर विविध कलमानुसार ( Minor Marriage girl case ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीचे शिक्षिका होण्याचे ( victims dream of becoming a teacher ) स्वप्न- पीडित मुलगी तिच्या आई व मामासह नेवाळी नाका भागात राहते. तिच्या आईला पूजा नावाच्या महिलेने पीडित मुलीसाठी गुजरातमध्ये विवाहासाठी मुलगा असल्याचे सांगितले. तेव्हापासून पूजा नावाच्या महिलेने मामाच्या मदतीने पीडित मुलीचे आधारकार्ड ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंतचा १८ वर्ष वयाचा पुरावा बनवला. तिचा विवाह गुजरातमधील तरुणाशी निश्चित केला. परंतु पीडित मुलीला पुढे शिकून शिक्षिका व्हायचे होते. मात्र तिच्या आईने ७ वी इयत्तेपर्यतच कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्यामुळे तिची शाळा बळजबरीने बंद केली. त्यातच विवाहसाठी पीडित मुलगी तयार नव्हती. तरी बळजबरीने मुलीची आई व मामाने पीडित मुलीला गुजरातमध्ये नेऊन तिचा २५ जून २०२२ रोजी जयेश नाथानी ( Accused Jayesh Nathani )नावाच्या २५ वर्षीय तरुणाशी विवाह केला.

मुलीच्या वडिलांना गुजरातमध्ये लग्नाला विरोध- तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका घस्ते यांनी सांगितले कि, आई आणि मामाने पीडितेला लग्नासाठी जबरदस्ती केली होती. त्यांनी तिची सर्व कागदपत्रे बदलून २५ जून रोजी गुजरातमध्ये लग्न होईपर्यंत त्यांनी तिला कधीही घराबाहेर बाहेर जाऊ दिले नाही. मात्र मुलीच्या वडिलांनी गुजरातमधील लग्नाला विरोध केला. म्हणून मुलीच्या आईने तिच्या वडिलांना लग्नात सामील होऊ दिले नाही.

सासरहून असा काढला पीडितेने पळ- दुसरीकडे मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला विवाह झाल्यानंतरही संधी मिळत नाही. मात्र ५ जुलै रोजी ती पुजेशी संबंधित काही कामासाठी सासरच्या नातेवाईकांसोबत घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्याकडे घरी परतण्याचे तिकीटाचे काही पैसे होते. ही संधी साधून तिने तेथून पळ काढला. ती उल्हासनगरला पोहोचली. पण तिला माहित होते की ती घरी परतली तर तिला तिच्या आईचे ऐकावे लागेल. तिला पुन्हा सासरी पाठवतील या भीतीने तिने हिल लाईन पोलीस ठाणे गाठले.

पीडित बालगृहात असून तिला शाळेत जाण्यासाठी मदत करू - तिच्यावर घडलेला प्रसंग सांगताच आई व मामासह पूजा नावाच्या महिलेवर फसवेगिरीचा व बालविकास प्रतिबंधक अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती आता सरकारी बालगृहात आहे. आम्ही तिला शाळेत जाण्यासाठी मदत करू असेही महिला सहायक पोलीस निरीक्षक अंबिका घस्ते यांनी सांगितले.

हेही वाचा-Misbehave With Woman : लज्जास्पद : जमीनीच्या वादातून महिलेला मारहाण करुन केले मुंडन, 5 दिवसांनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

हेही वाचा-Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राणांचा कार्यकर्ता; फेसबूकवर नवनीत राणांच्या अनेक पोस्ट

हेही वाचा-Umesh Kolhe Murder Case : माझ्या भावाच्या हत्येचा इव्हेंट करू नका - महेश कोल्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.