ETV Bharat / city

सकाळी लवकर उठून मुंब्र्यातील मदरशात या, जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंना आव्हान

राज ठाकरे यांनी सकाळी लवकर उठून मुंब्र्यातील मदरशात यावे. मदरशात दाढी करण्याचा एक वस्तराही सापडला तर राजकारण सोडेन, असे आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणाचा समाचार घेताना त्यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Apr 3, 2022, 1:14 PM IST

ठाणे - राज ठाकरे यांनी सकाळी लवकर उठून मुंब्र्यातील मदरशात यावे. मदरशात दाढी करण्याचा एक वस्तराही सापडला तर राजकारण सोडेन, असे आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणाचा समाचार घेताना त्यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी मिळते म्हणून राज ठाकरे ( Raj Thackeray ) पवारांवर टीका करतात, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड

'त्या' महाराष्ट्राला जाळण्याचा प्रयत्न करू नका - मदरशावरील व मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, बोलून जनतेचे टाळ्या मिळवणे फार सोपे असते. पण, आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील. महाराष्ट्रात या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार एकदा तरी करायला हवा होता. ज्या घरात आपला जन्म झाला त्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी झाली आहे. आज त्याच महाराष्ट्राला जाळण्याचा प्रयत्न करू नका, असेही आव्हाड म्हणाले.

विचारांची प्रगती की अधोगती - पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला ब्लू प्रिंट दाखवली. त्याबाबत त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. महाराष्ट्रातील तरुणांना कशाप्रकारे रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला. आता मात्र, मशिदीसमोर स्पिकर लावून हनुमान चालिसा लावायला सांगतात. तरुण पिढीला नेमके कोठे घेऊन जायचे आहे. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. राज्यातील नागरिक सुज्ञ आहेत, तेच ठरवतील, असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - शिवतीर्थावरचा कालचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता - खासदार संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.