ETV Bharat / city

Omicron Covid : कोविड उपचार केंद्रांमधील व्हेंटिलेटरसह सर्व उपकरणांची तपासणी करा - एकनाथ शिंदेंचे निर्देश

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ चा नवा घातक व्हेरियंट सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde meeting with BMC officers ) यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची (Eknath Shinde video conferencing meeting with officers) दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 27, 2021, 6:53 PM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करावी, असे निर्देश मंत्री शिंदे यांनी दिले.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ चा नवा घातक व्हेरियंट सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त व मुख्याधिकारी ( Meeting of BMC officers with Minister Eknath Shinde ) यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा-Rampath Yatra special train पुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे रवाना

आरोग्य यंत्रणांची तपासणी करा - एकनाथ शिंदे

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात कमी होत आहे. परंतु, प्रशाकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणा निर्धास्त झालेल्या दिसतात. सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत महत्त्वाचे निर्देश दिले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की दक्षिण आफ्रिकेतील घातक विषाणूंमुळे आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवावे. तसेच सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, विद्युत ऑडिट तातडीने करुन घ्या, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत. त्या रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहे. सामान्य नागरिकांकडून मास्क वापरण्यात टाळाटाळ केली जाते. अनेक ठिकाणी असे दृश्य दिसून येत आहे. अनावश्यक गर्दीदेखील होत असून त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करा. सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी याबाबत जनजागृती करावी. क्लिन अप मार्शलसारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिकास्तरावर मास्कची सक्ती करावी, असे निर्देशही ( Eknath Shinde directions to gov officers in Thane ) नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिले.

हेही वाचा- Health Minister Rajesh Tope : दक्षिण अफ्रिकेतील नव्या व्हेरिअंटचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम नाही - आरोग्यमंत्री

विदेशातील प्रवाशांची होणार चाचणी

मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन द्यावी. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अति जोखमीच्या देशातून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घ्याव्यात, अशी सूचना शिंदे यांनी केली. सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या प्रमुखांनी आपल्या अखत्यारितील अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन दक्ष राहावे. तसेच सर्व यंत्रणांची तपासणी करून घेण्याच्या सूचनाही नगरविकास मंत्र्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा-Omicron Covid New Variant : मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांची होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी - महापौर

मुंबई महापालिकेकडून तयारी सुरू-

मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( BMC additional commissioner on corona fight preparation ) यांनी संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले, की विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे केले जाईल. कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण केले जाणार नाही. दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार केले जातील, असे काकाणी म्हणाले. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करून त्याची चाचणी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्हेन्टिलेटरची तपासणी करून ते गरजेनुसार वापरता येईल, यादृष्टीने ते सज्ज करून ठेवले जातील. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करणार असल्याचे काकाणी म्हणाले. तर नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर दर दिवसाआड करण्याच्या सूचना दिल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर ( BCMC commissioner Abhijit Bangar on RTPCR tests ) यांनी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.