ठाणे - कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कोरोना आजाराची रुग्णांना भीती दाखवून खासगी रुग्णालयात लुटीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढत्या संख्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे अन्य आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसत आहे. काही खासगी रुग्णालयात अन्य आजाराच्या रुग्णांना रुग्णालये उपचारासाठी दाखल करुन घेत नाहीत. जर दाखल करुन घेतलेच तर त्या रुग्णांकडून अव्वाच्यासव्वा बिल उकळले जात असल्याचा प्रकार कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात समोर आला आहे.
रुग्णांकडून लूट केली तर गाठ माझ्याशी - नगरसेवक महेश गायकवाड
(मेट्रो) स्टार मल्टीस्पेशलीस्ट हाॅस्पिटलमध्ये रविंद्र राजभर हे उपचार घेत असताना त्यांना 3 दिवसाचे पीपीई किटचे 27 हजार रूपये घेवून कोरोनोच्या नावाने पैसे लुटत असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी मला कळवताच मी सहकाऱ्यासोबतच धाव घेऊन मेट्रो हाॅस्पिटलला दणका देत, बिलाची रक्कम कमी करून घेतली. यापुढे रूग्णांकडून जादा रक्कमेची लूट केली. तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही या खासगी हाॅस्पिटल प्रशासनाला दिल्याची माहिती नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली आहे.