ETV Bharat / city

Fire at Bhiwandi : मोदी डाईंग कंपनीसह भंगार गोदामाला भीषण आग; लाखोंचे नुकसान - भंगार गोदामाला भीषण आग

भिवंडी शहरातील माधवनगर धामणकर नाका परिसरात असलेल्या मोदी डाईंगचे बॉयलर ( Modi Dyeing Company ) मध्ये लिकेज झाल्याने त्यातून ऑईल गळती ( Oil spill ) सुरू झाली व अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आगीचे लोट दूरवरून दिसत होते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला ( Fire brigade ) यश आले आहे.

Fire at Bhiwandi
गोदामाला भीषण आग
author img

By

Published : Nov 28, 2021, 2:16 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यात ( Bhiwandi Taluka ) एकाच दिवशी दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून भिवंडी शहरातील माधवनगर धामणकर नाका परिसरात असलेल्या मोदी डाईंग मध्ये पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. तर त्याच सुमाराला भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील ( Khoni Village ) एका भंगार गोदामाला भीषण आग ( Massive Fire ) आग लागून संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

मोदी डाईंग कंपनीसह भंगार गोदामाला भीषण आग

बॉयलर मध्ये ऑईल गळती सुरू झाल्याने अचानक आग

भिवंडी शहरातील माधवनगर धामणकर नाका परिसरात असलेल्या मोदी डाईंगचे बॉयलर ( Modi Dyeing Company ) मध्ये लिकेज झाल्याने त्यातून ऑईल गळती ( Oil spill ) सुरू झाली व अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आगीचे लोट दूरवरून दिसत होते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला ( Fire brigade ) यश आले आहे.

भंगार गोदामाला भीषण आग -

दुसऱ्या घटनेत भिवंडी ग्रामीण परिसरात असलेल्या खोनी ग्रामपंचायत हद्दीमधील मच्छा कंपाऊंड मधील भंगार गोदामाला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली यामध्ये संपूर्ण भंगार गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले होते. त्यामुळे भंगार गोदामातील संपूर्ण माल जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आसपासच्या नागरिकांनी आगीला विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. त्यामुळे नागरिकांनी अग्निशमन दलाला आगीची घटना कळवली व तात्काळ भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व या आगीवर ती तब्बल तीन तासांनी नियंत्रण मिळवलेमागील दोन दिवसात आगीची ही चौथी घटना आहे. त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात हाच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.