ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, त्यांचा अनेकांना फटका बसला, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बेरोजगार झाल्यानंतर घरावर आर्थिक संकट कोसळले, त्यामुळे बेरोजागर झालेले नागरिक नैराश्येच्या गर्तेत अडकू लागले. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न अनेकांना सतावू लागला. तसेच या काळात दुसरी नोकरी मिळणे मुश्किल झाले. तर व्यवसाय करायला भांडवलाची मोठी अडचण अशी समस्याच्या गर्तेत अनेक तरुण अडकले होते. मात्र, अशाच बेरोजगार मराठी मुलांना उद्यमी महाराष्ट्रने तारले आहे. ठाण्यातील एका युवकाच्या संकल्पनेतून उद्यमी महाराष्ट्रने आयात निर्यातीच्या व्यवसायाच्या माध्यामतून अनेकांचा हाताला काम दिले आहे.
कोरोनाकाळात बेरोजगारांना इम्पोर्ट-एक्सपोर्टचा आधार; उद्यमी महाराष्ट्राने घडवले अनेक मराठी निर्यातदार - ओकार माळी
मराठी माणसाने व्यवसाय करावा या उद्देशाने डॉ. ओंकार हरी माळी यांनी गेल्यावर्षी ही चळवळ उभी केली. आज या चळवळीशी महाराष्ट्रातील आणि परदेशातील मराठी माणसे जोडली गेली आहेत. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद पडलेले असताना इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरू होता. इम्पोर्ट-एक्सपोर्ट हा असा व्यवसाय आहे, की ज्याला मरण नाही, असे डॉ. ओंकार हरी माळी यांनी सांगितले.