वसई वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म Vasai Railway Station वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने झोपेतून उठवून ट्रेनखाली ढकलले Vasai Threw Wife Under Train होते. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला wife dead after throwing under train Vasai होता. रेल्वे प्लॅटफॉर्म वर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने वसई रेल्वे पोलिसांनी वसई स्थानकावर पत्नीला रेल्वेखाली ढकलून ठार मारणाऱ्या Vasai Man Threw Wife Under Train आणि त्याच्या २ मुलांसह पळून जाणाऱ्या व्यक्तीविरुद् कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला भिवंडी येथून अलीकडेच अटक केली Husband arrested after throw wife under train. मेहेंदी हसन असे आरोपीचे नाव असून मृतक पत्नीचे नाव नूरसिना असल्याचे सांगण्यात आले.
काय घडले होते त्या दिवशी 22 ऑगस्टला सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसई रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना तिच्या पतीने तिला अचानक उठवले. त्यानंतर अचानक भरधाव वेगात येणाऱ्या एक्सप्रेस मेल ट्रेनखाली त्याने पत्नीला ढकलून दिल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून येत आहे.
हे होते हत्याकांडामागील कारण मिळालेल्या माहितीनुसार मेहंदी हसन या ३८ वर्षीय व्यक्तीचे नूरसिना या महिलेसोबत लग्न झाले होते. दोघांना पाच आणि दीड वर्षांचे असे दोन मुले आहेत. नूरसिनाचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. काही दिवसांपूर्वी नूरसिना आपल्या पतीला आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत रहायला गेली. तसेच आपल्या पतीकडे येण्यास तिने नकार दिला. परंतु मुलांना सारखी आपल्या आईची आठवण येत होती, पती मेहंदी हसनने कशीबशी समजूत काढून तिला घरी आणले. रविवारी ती पुन्हा घर सोडून गेली, तेव्हा मेहंदी हसनने तिला फोन केला आणि घरी येण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला. त्यानंतर नूरसिनाने आपण वसई रेल्वे स्थानकावर असल्याचे सांगितले. तेव्हा मेहंदी हसन दोन्ही मुलांसह वसई रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेव्हाही मेहंदी हसनने नूरसिनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु नूरसिना ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हती. अखेर नूरसिना घरी येणार नसल्याचे मेहंदी हसनला कळाले. तेव्हा पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी वसई रेल्वे स्थानकावरून अवध एक्सप्रेस येत होती, तेव्हा मेहंदी हसनने नूरसिनाला उठवले आणि प्लॅटफॉर्मच्या कडेला नेले. ट्रेन जशी जवळ आली तसे मेहंदीने नूरसिनाला रुळावर ढकलले. गाडी वेगात असल्याने नूरसिनाच्या अंगावरून गाडी गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी अशाप्रकारे लावला आरोपीचा शोध मेहंदी हसनने बायकोला ढकलल्यानंतर मुलांना घेऊन घटनास्थळाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्हीतील फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मेहंदी हसनचा शोध घेतला. मेहंदी हसन ट्रेनने वसईहून कल्याणला पोहोचला आणि कल्याणहून रिक्षा करून भिवंडीला पोहोचला. पोलिसांनी मेहंदी हसनचा शोध घेण्यासाठी रिक्षा युनियनच्या लोकांची मदत घेतली आणि त्याला शोधून काढले. पोलिसांनी मेहंदी हसनला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या दोन्ही मुलांना हसनच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले आहे.